"आर.के. लक्ष्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
 
==जन्म व सुरुवातीचे आयुष्य==
सुप्रसिद्ध लेखक [[आर.के. नारायण]] यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ या दिवशी [[म्हैसूर]] येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी अनेक नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. 'हार्पर्स', 'पंच', 'ऑन पेपर', 'बॉइज', अ‍ॅटलांटिक', अमेरिकन मर्क्युरी', 'द मेरी मॅगझिन', स्ट्रँन्डस्ट्रॅन्ड मॅगझिन', अशी मासिके त्यांना तिथे पहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले.
 
==कारकीर्द==
अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स येथे शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर. केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी. ए. ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी [[दिल्ली|दिल्लीला]] गेले. ''हिंदुस्थान टाइम्स'' या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ''ब्लिट्झ'' मध्ये आणि नंतर ''फ्री प्रेस जर्नल'' मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी [[बाळासाहेब ठाकरे]] देखील तेथेच काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी 'फ्री प्रेस'ची नोकरी सोडली. त्यानंतर अर्धशतकभर ते 'टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये व्यंगचित्रेरंव्यंगचित्रे काढत राहिले. '''यू सेड इट''' नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्यांचे व्यंगचित्र या दैनिकात नाही असे एकदाही घडलेले नाही.
 
लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे '''कॉमन मॅन''' नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे - चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत.
ओळ ६३:
घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास याच्या जोरावर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सहजच लक्षात राहतात. आसपासच्या घटना मिस्किलपणे दाखवीत असल्याने लक्ष्मण यांची चित्रे खास आहेत. त्यांच्यावर तोचतोचपणाचे आरोपही झाले, पण त्यांनी कधी चिडून कोणाला उत्तर दिले नाही.
 
रा. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की त्याचा एक पूर्णाकृती पुतळाही बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी ''एशियन पेन्ट्‌स'' साठी काढलेले ''गट्टू''चे चित्रही लोकप्रिय आहे. आर.के, लक्ष्मण हे कथालेखक व कादंबरीलेखकही आहेत. त्यांनी लिहिलेली निबंधांची आणि प्रवासवर्णनांचीही पुस्तके आहेत.
 
लक्ष्मण यांचे थोरले भाऊ प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचा लक्ष्मण यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्यासाठीही बरीच व्यंगचित्रे काढली. तसेच इतर अनेक लेखकांसाठी व्यंगचित्रे काढली आहेत. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या कथा दैनिक 'हिंदुहिंदू मधून प्रसिद्ध होत असत. या कथांसाठी लक्ष्मण यांच्याकडूनच ते चित्रे काढून घेत असत. सरावाने आर.के. लक्ष्मण अधिकाधिक चांगली चित्रे काढू लागल्यामुळे इतर लेखकही त्यांच्याकडून चित्रे काढवून घेऊ लागले. त्यांच्या पत्नीपत्‍नी कमला यांच्या गोष्टींसाठीही त्यांनी चित्रे काढून दिली. व्यंगचित्रांचे त्यांना विशेष आकर्षण होते. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. स्थानिक वर्तमानपत्रांतूनही त्यांच्या व्यंगचित्रांना प्रसिद्धी मिळत असे.
 
इतका दीर्घकाळ व्यंगचित्रे काढणारा हा बहुधा एकमेव व्यंगचित्रकार असावा. त्यांचा 'कॉमन मॅन' गेल्या पन्नास वर्षातील देशातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा-उलथापालथीचा साक्षीदार आहे. चौकटीचा कोट आणि धोतर अशा पेहरावातील त्यांची छबी सतत कायमच राहिली आहे. आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रेरं आणि त्यावरील भाष्ये मार्मिक असतात. भारतीय मानसिकतेतून उमटलेली ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते. प्रसंगी ही प्रतिक्रिया खरमरीत, बोचकही असते. आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रांमध्ये प्राजंळपणाचंही दर्शन घडते. मात्र एखाद्या व्यक्तीचे व्यंग्य दर्शवणारी व्यंगचित्रेरं त्यांनी काढली नाहीत, किंवा कोणाला दुखावण्यासाठीही त्यांनी त्यांच्या कुंचल्याचा वापर केला नाही. जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी , सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक पिढया त्यांनी रेखाटल्या आहेत. एका साध्या रेषेतून या नेत्याचे व्यक्तिवैशिष्ट्य स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे.
ओळ ७४:
 
तथापि, आर. के. लक्ष्मण यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे अचूक भान आहे. हेच भान त्यांच्या कॉमन मॅन' मधून व्यक्त होते. कोणत्याही काळातील, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला त्यांचे विधान पटते, रुचते आणि म्हणूनच त्यांची लोकप्रियता दीर्घकाळ टिकून राहिली आहे.
 
==आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके==
* आयडल अवर्स
* द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह)
* द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र; मराठीत -लक्ष्मणरेषा)
* फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह)
* बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका)
* द मेसेंजर (कादंबरी)
* द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी)
 
==पुरस्कार==
* लक्ष्मण यांना त्यांच्या व्यंगचित्रांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांत [[पद्मभूषण]](१९७१), [[पद्मविभूषण]] (२००५), [[रॅमन मॅगसेसे पुरस्कार]](१९८४) आदिआदी महत्त्वाचे पुरस्कार आहेत.
* मराठा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी दिली आहे.
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार
 
==आजारपण==