"मन्नू भंडारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
मन्नू भंडारी यांनी १९५२-६१ या काळात बालीगंज शिक्षा सदन येथे आणि, १९६१-६४ या काळात राणी बिर्ला कॉलेजात अध्यापन केले. १९६४मध्यी त्या मिरांडा कॉलेजात हिंदीच्या प्राध्यापक झाल्या आणि १९७१मध्ये निवृत्त होईपर्यंत त्र्थेच काम करीत राहिल्या. निवृत्तीनंतर १९९२-९४ दरम्यान उज्जैनमध्ये प्रेमचंद सृजनपीठ या संस्थेच्या प्रमुख होत्या.
 
==लेखन कारकीर्द==
’मैं हार गई’ ही मन्नू भंडारी यांची पहिली कथा. त्यांच्या अनेक कथा वास्तवावर आधारलेल्या आहेत.
 
मन्नू भंडारी यांच्या कादंबर्‍यांचे आणि कथांचे मराठी, सिंधी, गुजराथी, बंगाली, कानडी, उडिया, मल्याळम, तेलुगू आणि इंग्रजी भाषांत अनुवादही झाले आहेत. त्यांच्या महाभोज या नाटकाचे मराठीतही प्रयोग झाले आहेत. अकेली आणि चष्मे या कथांचेही नाट्यरूपांतर झाले आहे. ’त्रिशंकु’ या कथेवर एक दूरदर्शन चित्रपट झाला आहे. मन्नू भंडारी यांनी प्रेमचंद यांच्या निर्मला कादंबरीवर आधारित हिंदी दूरचित्रवाणी मालिकेचे पटकथालेखन केले आहे. चित्रवाणीवरील दर्पण या हिंदी मालिकेसाठी त्यांनी विविध भारतीय भाषांतील दहा कथांचे लेखनही केले आहे.
 
शरच्चंद्र याच्या 'स्वामी' या मूळ कथेचा विस्तार करुन 'स्वामी' ही कादंबरी मन्नू भंडारी यांनी लिहिली. या कथानकावर आधारित असलेला सिनेमा 'स्वामी'! तोही खूप गाजला. त्यातील शबाना आझमी व गिरीश कर्नाड यांचा अभिनय आजही अनेक रसिकांच्या मनात घर करुन असेल. मन्नू भंडारी यांच्या 'स्वामी' या हिंदी कादंबरीचा अनुवाद 'सौदामिनी' या नावाने नवचैतन्य प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. 'सौदामिनी' हा अनुवाद चंद्रकान्त भोंजाळ यांनी साकारला आहे.
 
मन्नू भंडारी यांचे पती कै.राजेंद्र यादव हे हिंदी नवकथेचे आद्य प्रवर्तक, लेखक आणि समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या ’एक इंच मुस्कान’ या कादंबरीतील नायिकेचा भाग मन्नू भंडारी यांच्या लेखणीतून उतरला आहे.