"शंकर काशिनाथ गर्गे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''नाट्यछटाकार दिवाकर''' ([[शंकर काशिनाथ गर्गे]]) (जन्म : १८ जानेवारी,१८८९; मृत्य्पू : १ ऑक्टोबर, १९३१) हे मराठी लेखक होते. मराठीत [[नाट्यछटा]] हा लेखनप्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले जाते. त्यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. 'महासर्प' ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. 'मग तो दिवा कोणता', 'पंत मेले राव चढले', 'वर्डस्वर्थचे फुलपाखरूं', 'चिंगी महिन्याची झाली नाही तोच', 'शिवी कोणा देऊं नये', 'फाटलेला पतंग' इ. त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. पंत मेले राव चढले या नाट्यछटेच्या नावानेच वाक्प्रचारही मराठीत रुजलेला आहे.<ref>http://mr.upakram.org/node/83</ref>
 
==बालपण==
दिवाकरांचा जन्म [[पुणे]] येथे झाला. दिवाकरांचे वडील राजेवाडी या ठिकाणी स्टेशनमास्तर होते. कालांतराने ते [[पुणे|पुण्यास]] राहाण्यास आले. दिवाकर हे त्यांचे दुसरे अपत्य होते. दिवाकर अडीच वर्षांचे असताना त्यांना आजीस दत्तक देण्यात आले. हे दत्तक विधान नाममात्र होते. आपल्या बालपणी झालेल्या या दत्त्तकदत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुषी व्यक्त केली होती. त्यांच्या चुलत्यांनाही हे दत्तक विधान पसंत नव्हते. शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्यातले नाव होते. पुढे त्यांनी त्यांचे सर्व लिखाण दिवाकर या नावाने प्रसिद्ध केले.
 
==शिक्षण==
ओळ ४५:
दिवाकरांनी इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेले होते. यातूनच त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल. [[मार्च २७]] [[इ.स. १९११|१९११]] रोजी त्यांनी थॉमस मिडलटनच्या 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' या नाटकाच्या आधारे '[[रंगेल रंगराव]]' नामक नाटक लिहिण्यास सुरुवात केली. काही कालावधीनंतर गटेच्या 'फ्राउस्ट' हे नाटक वाचल्यानंतर त्यांनी या नाटकाच्या आधारे '[[पंडित विद्याधर]]' नावाचे नाटक लिहिण्याचे काम हाती घेतले. ब्राउनिंगच्या 'ड्रॅमॅटिक मोनोलॉग' या लेखनप्रकारावरूनच दिवाकरांनी [[नाट्यछटा]] हा लेखनप्रकार विकसित केला. [[सप्टेंबर १८]] [[इ.स. १९११|इ.स. १९११]] रोजी दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली. पुढच्या दोन वर्षांतच दिवाकरांनी त्यांच्या एकूण नाट्यछटांपैकी बहुतेक नाट्यछटा लिहिल्या. ’नाट्यछटा’ हा शब्द दिवाकरांना [[वासुदेव बळवंत पटवर्धन]] यांनी सुचविला. नाट्यछटा हा प्रकार लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना पटवर्धनांनीच दिली असे मानले जाते.
 
[[इ.स. १९१३|१९१३]] नंतर मात्र दिवाकरांचे नाट्यछटांचे लेखन मागे पडले. 'शोकान्‍त' हा नाट्याचा नवीन प्रकार दिवाकरांनी [[इ.स. १९१३|१९१३]] मध्ये लिहिण्यास सुरुवात केली. [[इ.स. १९१४|१९१४]] साली "मी माझ्याशी!" ही नाट्यसंवादांची लेखमालिका लिहिण्यास दिवाकरांनी सुरुवात केली. 'पाऊस', 'निजलेले मूल', 'सुट्टी! शाळेला सुट्टी!', 'ती बिचारी रडतेच आहे!' हे नाट्यप्रसंगही दिवाकरांनी [[इ.स. १९१४|१९१४]] सालीच लिहिले. 'कारकून' हे तीन अंकी नाटकही त्यावर्षीच पूर्ण झाले. [[इ.स. १९१५|१९१५]] साली 'सगळेच आपण ह्य: ह्य:' , 'ऐट करू नकोस!' आणि 'आय.सी.एस.'(अप्रकाशित) या नाटिका लिहल्या. [[इ.स. १९१६|१९१६]] मध्ये दिवाकरांनी मेटरलिंकच्या 'द साइटलेस' ( Les Aveugles ) या नाट्यकृतीचे रूपांतर केले. [[इ.स. १९२३|१९२३]] ते [[इ.स. १९३१|१९३१]] या आठ वर्षांच्या काळात दिवाकरांनी दहा नाट्यछटा लिहिल्या. शेवटी दिवाकरांनी 'अहो मला वाचता येतंय!', 'कमीचा मन्या', 'मसालेदार ताजा चिवडा', 'आले कोठून, 'गेले कोठे', 'भर चौकात' याअसे साध्या शब्दांतून-प्रसंगांतून जीवनविषयक खोल आशय सुचविणारे नाट्यप्रवेश लिहिले. कारकुनासारख्या सामान्य माणसांच्या वास्तविक आयुष्याचे स्वाभाविक स्वरूपात चित्रण करणारे तीन अंकी नाटक ’कारकून’ लिहिले. भावकथा लिहिल्या.
 
==लेखन प्रसिद्धी==
ओळ ५४:
 
==वाचन==
दिवाकर यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी साहित्याचे वाचन केलेले होते. शेक्सपियर, शेली, ब्राउनिंग, कीट्स, वर्डस्वर्थ यांसारख्या इंग्रजी लेखकांचे साहित्य त्यांनी अभ्यासलेले होते. शेक्सपियर या इंग्रजी नाटककाराच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास (काळ-[[इ.स. १९११|१९११]]) त्यांनी केलेला होता. याशिवाय मोलियर, टॉलस्टॉय इ. लेखकांचे ग्रंथही त्यांनी वाचलेले होते. नाटककारांपैकी इब्सेन, गाल्सवर्दी, मेटरलिंक, हाउप्टमान इत्यादींची नाटके त्यांनी (काळ-[[इ.स. १९१३|१९१३]]) वाचलेली होती. [[इ.स. १९१८|१९१८]] ते [[इ.स. १९२२|१९२२]] या काळात दिवाकर यांनी ऑस्कर वाइल्ड, पुश्किन, पिनिअरो, गॉर्की या लेखकांचे ग्रंथ वाचले तर आयुष्याच्या शेवटच्या आठ वर्षात बॅरी, ए.ए. मिलन, ड्रिंकवॉटर, कॅथरिन मॅन्सफिल्ड या लेखक लेखिकांची पुस्तके वाचून त्यावरील टीकावाङमयहीटीकावाङ्‌मयही दिवाकरांनी वाचून पूर्ण केले.
 
==केशवसुत आणि दिवाकर==
ओळ ११९:
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
 
[[वर्ग: रविकिरण मंडळ]]
[[वर्ग:इ.स. १९३१ मधील मृत्यू]]