"शंकर काशिनाथ गर्गे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने लेख दिवाकर वरुन शंकर काशिनाथ गर्गे ला हलविला: शीर्षक लेखन संकेत
(चर्चा | योगदान)
ओळ ४३:
 
==लिखाण==
दिवाकरांनी इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेले होते. यातूनच त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल. [[मार्च २७]] [[इ.स. १९११|१९११]] रोजी त्यांनी थॉमस मिडलटनच्या 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' या नाटकाच्या आधारे '[[रंगेल रंगराव]]' नामक नाटक लिहिण्यास सुरुवात केली. काही कालावधीनंतर गटेच्या 'फ्राउस्ट' हे नाटक वाचल्यानंतर त्यांनी या नाटकाच्या आधारे '[[पंडित विद्याधर]]' नावाचे नाटक लिहिण्याचे काम हाती घेतले. ब्राउनिंगच्या 'ड्रॅमॅटिक मोनोलॉग' या लेखनप्रकारावरूनच दिवाकरांनी [[नाट्यछटा]] हा लेखनप्रकार विकसित केला. [[सप्टेंबर १८]] [[इ.स. १९११|इ.स. १९११]] रोजी दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली. पुढच्या दोन वर्षांतच दिवाकरांनी त्यांच्या एकूण नाट्यछटांपैकी बहुतेक नाट्यछटा लिहिल्या. ’नाट्यछटा’ हा शब्द दिवाकरांना [[वासुदेव बळवंत पटवर्धन]] यांनी सुचविला. नाट्यछटा हा प्रकार लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना पटवर्धनांनीच दिली असे मानले जाते.
 
[[इ.स. १९१३|१९१३]] नंतर मात्र दिवाकरांचे नाट्यछटांचे लेखन मागे पडले. 'शोकान्‍त' हा नाट्याचा नवीन प्रकार दिवाकरांनी [[इ.स. १९१३|१९१३]] मध्ये लिहिण्यास सुरुवात केली. [[इ.स. १९१४|१९१४]] साली "मी माझ्याशी!" ही नाट्यसंवादांची लेखमालिका लिहिण्यास दिवाकरांनी सुरुवात केली. 'पाऊस', 'निजलेले मूल', 'सुट्टी! शाळेला सुट्टी!', 'ती बिचारी रडतेच आहे!' हे नाट्यप्रसंगही दिवाकरांनी [[इ.स. १९१४|१९१४]] सालीच लिहिले. 'कारकून' हे तीन अंकी नाटकही त्यावर्षीच पूर्ण झाले. [[इ.स. १९१५|१९१५]] साली 'सगळेच आपण ह्य: ह्य:' , 'ऐट करू नकोस!' आणि 'आय.सी.एस.'(अप्रकाशित) या नाटिका लिहल्या. [[इ.स. १९१६|१९१६]] मध्ये दिवाकरांनी मेटरलिंकच्या 'द साइटलेस' ( Les Aveugles ) या नाट्यकृतीचे रूपांतर केले. [[इ.स. १९२३|१९२३]] ते [[इ.स. १९३१|१९३१]] या आठ वर्षांच्या काळात दिवाकरांनी दहा नाट्यछटा लिहिल्या. शेवटी दिवाकरांनी 'अहो मला वाचता येतंय!', 'कमीचा मन्या', 'मसालेदार ताजा चिवडा', 'आले कोठून, 'गेले कोठे', 'भर चौकात' या भावकथा लिहल्यालिहिल्या.
 
==लेखन प्रसिद्धी==