"वासुदेव बळवंत पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वासुदेव बळवंत पटवर्धन (जन्म : १५ मे, १८७०-; मृत्यू : २६ ऑक्टोबर, १९२१) हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील इंग्रजीचे एक व्यासंगी प्राध्यापक होते. ते [[शेक्सपियर]] आणि बाउनिंग उत्तम शिकवत. मराठी भाषेचा माध्यमिक शिक्षणात, विद्यापीठांत सर्वत्र वाजवी हक्काने प्रवेश व्हायला हवा या न्यायमूर्ती रानड्यांच्या मार्गाने चालू राहिलेल्या सर्व चळवळीत वासुदेव बळवंत पटवर्धन अग्रभागी असत. पटवर्धन स्वतःही कवी होते. वसंत या [[टोपणनावानुसार मराठी कवी|टोपणनावाने]] त्यानी कविता लिहिल्या आहेत.
 
पटवर्धनांचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यास, व माध्यमिक शिक्षण नागपूरला झाले. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून १८९३ साली बी.ए.ची पदवी मिळविली. त्यानंतर ते पुण्याला प्रथम न्य़ू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आणि नंतर फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाले.
 
"काव्य आणि काव्योदय" (१९०९) हा पटवर्धनांनी लिहिलेला पहिला ग्रंथ. ह्या ग्रंथात त्यांनी काव्याच्या संदर्भात काही प्रश्नांची चर्चा केली आहे. मराठीतील आधुनिक साहित्य तत्त्वविवेचनाला खराखुरा प्रारंभ या ग्रंथापासून झाला असे म्हटले जाते. काव्योदय आणि भौतिक व मानवी परिस्थिती यांतील परस्पर संबंध पटवर्धनांनी या ग्रंथात विशद केला आहे. मराठीतील काव्यवाङ्‌मय प्रामुख्याने निवृत्तिपर बनण्याला महाराष्ट्राची अस्थिर राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे असे त्यांचे मत होते.
 
पुण्यातील काही जाणकार मंडळी १९०१ ते १९१४ या काळात एकत्र येऊन [[संत तुकाराम]] यांच्या अभंगांवर व तुकाराम गाथेवर चर्चा करत असत. या चर्चेतून निघालेले सार आणि त्या टिपणांच्या आधारे [[गणेश हरी केळकर]] व प्रा.वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी संपादन करून ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हे दोन खंड तयार केले होते. माधव रामचंद्र जोशी यांनी हे खंड १९२७ मध्ये प्रकाशित केले होते. हे दोन्ही खंड दुर्मीळ झाल्यामुळे, त्यांचे महत्त्व ओळखून दिल्लीच्या साहित्य अकादमीने हे दोन्ही खंड फेब्रुवारी २००९मध्ये पुनःप्रकाशित केले आहेत.