"दत्तप्रसाद अच्युत दाभोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दत्तप्रसाद दाभोळकर (जन्म: १९३८; लग्न : १९७०) हे एक वैज्ञानिक आणि ले...
(काही फरक नाही)

१९:२७, १२ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

दत्तप्रसाद दाभोळकर (जन्म: १९३८; लग्न : १९७०) हे एक वैज्ञानिक आणि लेखक आहेत. हे अच्युत लक्ष्मण दाभोळकर व ताराबाई अच्युत दाभोळकर या दांपत्याच्या दहा अपत्यांपैकी एक. कोकणातील वेंगुर्ल्याजवळच्या दाभोली गावचे मूळ रहिवासी. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दत्तप्रसाद दाभोळकरांचे वडील अच्युतराव सातार्‍याला आले व फौजदारी वकिली करू लागले. वकिली करण्यासाठी दाभोलीकर किंवा दाभोलकर असे आडनाव न लावता त्यांनी दाभोळकर हे आडनाव स्वीकारले. मात्र, दत्तप्रसाद यांचे बंधू देवदत्त आणि नरेंद्र हे त्यांचे आडनाव दाभोलकर असे लिहितात.

शिक्षण आणि संशोधन

दाभोळकरांचे सुरुवातीचे शिक्षण सातार्‍यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे सिबा कंपनीत असतानाच, इ.स. १९६७ ते १९६९ या काळात त्यांनी पार्ला कॉलेजचे प्रसिद्ध गांधीवादी खादीधारी डॉ.के.एस.नरगुंद यांच्या हाताखाली पीएच.डी. केले. हा सर्व अभ्यास त्यांनी सकाळी आणि रात्री ऑफिसच्या वेळेबाहेर मेहनत घेऊन केला. सिबा कंपनीत चालणारे सर्व संशोधन मुळात त्यांच्या स्वित्झर्लंडमधील मुख्य कंपनीसाठी होते. दाभोळकरांनी पीएच.डी. मिळविलेली त्यांना अजिबात आवडली नाही. ही पीएच.डी परत करा किंवा कंपनीच्या नोकरीचा राजीनामा द्या हा पर्याय दत्तप्रसाद दाभोळकरांपुढे ठेवण्यात आली. दाभोळकरांनी अर्थात राजीनामा दिला.

आठ वर्षे सिबा कंपनीत, तीन वर्षे अॅनासिन बनविणार्‍या जॉफ्री मॅनर्समध्ये, सात वर्षे राजस्थानातील कोटा गावच्या जे.के.सिंथेटिक्समध्ये आणि शेवटची तेवीस वर्षे दिल्लीच्या श्रीराम इन्स्टिटूटमध्ये संशोधकाची नोकरी करून दत्तप्रसाद दाभोळकर निवृत्त झाले. त्याच वेळी सरकारी क्षेत्रातील संशोधनाचाही त्यांनी अभ्यास केला. भारतातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संशोधनक्षेत्राने दिलेले योगदान अगदी नगण्य म्हणावे असे आहे हा दाभोळकरांचा निष्कर्ष आहे. म्हणूनच, भारतातील विज्ञान-संशोधन क्षेत्रात ज्या त्रुटी आहेत त्यावर प्रकाशझोत टाकणारे विपुल लिखाण दत्तप्रसाद दाभोळकरांनी केले आहे.



(अपूर्ण)