"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
मराठी भाषा [[भारत|भारतासह]] [[मॉरिशस]] व [[इस्रायल]] या देशांतही बोलली जाते.<ref name="eth">[http://www.ethnologue.com/show_language.asp?code=mar एथनोलॉगचा मराठी बाबतचा अहवाल]</ref> त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], संयुक्त अरब अमिरात, [[दक्षिण आफ्रिका]], [[पाकिस्तान]], [[सिंगापूर]], [[जर्मनी]], [[युनायटेड किंग्डम]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यू झीलंड]] येथेही बोलली जाते.<ref name="indianlang">[http://www.indianlanguages.com/marathi/index-new1.htm इंडियनलँग्वेजेस.कॉम- मराठी]</ref>
 
भारतात, मराठी मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[गोवा]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[आंध्र प्रदेश]], [[मध्य प्रदेश]], [[तमिळनाडू]] व [[छत्तीसगढ]] राज्यांत आणि [[दमण आणि दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]] या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- [[वडोदरा|बडोदा]], [[सुरत]], दक्षिण गुजरात व [[अहमदावाद]] (गुजरात राज्य), [[बेळगांव]], [[हुबळी]]- धारवाड, [[गुलबर्गा]], [[बीदर|बिदर]], उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), [[हैदराबाद]] (आंध्र प्रदेश), [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]] (मध्य प्रदेश) व [[तंजावर]] (तमिळनाडू), वगैरे. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषकांची वस्ती आहे.
 
== राजभाषा ==
भारताच्या राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही [[महाराष्ट्र]] राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. [[गोवा|गोवा राज्यात]] कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. असे असले तरी राज्यकारभार आणि पत्रव्यवहार लोकांच्या सोयीसाठी इंग्रजीत केला जातो.[http://nclm.nic.in/shared/linkimages/35.htm ४२वा अहवाल- जुलै २००३-०४] pp. para 11.3</ref>, [[दादरा व नगर हवेली]]<ref>[http://dnh.nic.in/deptdoc/vguide.pdf दादरा व नगर हवेली प्रशासनाचे माहितीपत्रक]</ref> या केंदशासितकेंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
 
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)<ref>[http://www.unigoa.ac.in/department.php?adepid=8 गोवा विद्यापीठ- मराठी विभाग]</ref>, महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)<ref>[http://www.msubaroda.ac.in/departmentinfo.php?ffac_code=1&fdept_code=11 महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा]</ref>, उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश), गुलबर्गा विद्यापीठ<ref>[http://www.gulbargauniversity.kar.nic.in/deptmarathi.htm गुलबर्गा विद्यापीठ]</ref>, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)<ref>[http://www.dauniv.ac.in/rules/statute.doc देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर]</ref> व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)<ref>[http://www.jnu.ac.in/main.asp?sendval=SchoolOfLanguage जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली]</ref> येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.
 
==मराठी पुस्तके==
मराठीत आजवर एक लाख पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांतली हजारभर तरी जागतिक साहित्यांत स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात, व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, आणि छोटीमोठी अडीचशे [[साहित्य संमेलने]] भरतात. नामवंत्खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपरेयंत आहे.सरकारी संस्था ’बालभारती’दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारतातील सर्वाधिक खपाचे मासिक ’लोकराज्य’ हे, आणि देशातले सर्वाधिक खपाचे चौथ्या क्रमांकाचे वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे, असे म्हणतात. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.
 
शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत, चरित्र कोश, तत्त्वज्ञानकोश, वाङ्मय कोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, ज्ञानकोश, असे शेकडो प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो, असे म्हटले जाते.
 
==पुरस्कार==
* विंदा करंदीकर, कुसुमाग्रज आणि वि.स. खांडेकर अशी तीन मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
* ’ज्ञानपीठ’च्या बरोबर समजला जाणारा ’मूर्तिदेवी प्रस्कार’ शिवाजी सावंत यांना ’मृत्युंजय’ या कादंबरीसाठी मिळाला आहे.
* महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना ’सरस्वती सन्मान’ मिळाले आहेत.
* विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना ’कालिदास सन्मान’ मिळाले आहेत.
* महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांच्या नावाने ’अखिल भारतीय कला सन्मान’ दिला जातो.
* ’भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आजवर [[बालगंधर्व]], ...... इत्यादींना मिळाले आहेत.
* सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपति सुवर्णकमळ [[आचार्य अत्रे]] यांच्या श्यामची आई’ला मिळाले होते.
* डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]], [[धोंडो केशव कर्वे]], [[पां.वा. काणे]], [[भीमसेन जोशी]], [[जे.आर.डी. टाटा]], [[सचिन तेंडुलकर]], [[विनोबा भावे]], [[सी.एन.आर. राव]], आणि लता मंगेशकर]] हे आजवरचे भारतरत्‍न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीय.
== मराठी भाषेचा इतिहास ==
{{मुख्यलेख|मराठी भाषेचा इतिहास}}