"पत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
==गणेशपूजनातील २१ पत्री==
;१. अगस्ती(हादगा):
अगस्ती म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतीज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.
;२. अर्जुन:
अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.
Line १० ⟶ ११:
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). याचा उपयोग तारतम्याने करावा, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.
;५. केवडा:
केवडय़ाची पाने. (PendenusTectoritus). केवडय़ाच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप घालून हे सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवडय़ाचा लेप लावला जातो.
;६. जातिपत्र:
जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढय़ाने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.
;७. डाळिंब:
दाडिमपत्रे अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब
Line २१ ⟶ २४:
दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.
;११.देवदार:
चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.
;१२.धोत्रा:
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.
;१३.पिंपळ:
अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.
;१४.बेल;
बेलाची पाने (Aegle Marmelos. बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतडय़ाच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.
Line २९ ⟶ ३४:
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.
;१६.मरवा:
मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana). मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.
;१७.मधुमालती:
मधुमालती म्हणजे मालती किंवा चमेली (शास्त्रीय नाव - Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पत्री" पासून हुडकले