"विद्रोही सांस्कृतिक चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळ नेमकी केव्हापासून सुरू ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ नेमकी कोण चालवते ते अस्पष्ट आहे. पण २००२ साली अमरावतीला भरलेल्या त्या ४थ्या [[विद्रोही साहित्य संमेलन|विद्रोही साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष डॉ.नदाफ यांनी त्यांच्या भाषणात "विद्रोही चळवळ ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, शेतकरी कामकरी पक्ष, भारतीय रिपाब्लिकन पार्टी, बहुजन महासंघ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इत्यादी विविध सांस्कृतिक पक्षांची आघाडी आहे” असे म्हटले होते. असे असले त्यांचे म्हणणे तितकेसे खरे नसावे. अन्य विद्रोहीवाल्यांना ते पटले नसणार.
 
==२०१४ सालची स्थिती==
 
महाराष्ट्रात प्रस्थापित साहित्य-सांस्कृतिक चळवळीला संमांतर अशी विद्रोही सांस्कृतिक चळवळ सुरू झाल्यावर या चळवळीवर फुले-आंबेडकरांपेक्षा मार्क्‍सवादाचा अधिक पगडा होता असे आरोप होत असत. नक्षलवादाकडे झुकणारी चळवळ अशा संशयाच्या भोवऱ्यात ही चळवळ सापडली. त्यातून अंतर्गत वाद सुरू झाला. विद्रोहीला फुटीचे तडे गेले. हे तडे बुजवत आता विद्रोहीची फेरमांडणी सुरू आहे. विद्रोहीचा नवा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यातून फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने असणाऱ्या मार्क्‍सला दूर करण्यात आले आहे. मात्र अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या विद्रोही चळवळीने बहुजनांच्या दैवतांच्या उदात्तीकरणाचा धोका पत्करला आहे. त्यामुळे मार्क्‍स वजा करुनही विद्रोहींची वैचारिक दिशा स्पष्ट होत नाही.
 
[[मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनावर]] बहिष्कार टाकून स्वतंत्र संमेलने भरविण्याची विद्रोहीने परंपरा सुरू केली. बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर यांच्याबरोबरीने मार्क्‍सवादी विचार प्रमाण मानून चळवळ विस्तारण्याचा प्रयत्न झाला. विद्रोही चळवळीतील काही कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून तुरुंगांत डांबण्यात आले. विद्रोही आणि नक्षलवादी चळवळीतील सीमा रेषा स्पष्ट नसल्यामुळे हा गोंधळ झाला. त्यातच माओवाद्यांनी त्यांच्या नव्या डावपेचांत दलित चळवळीला लक्ष्य केले. दलितांवरील अत्याचाराचे भांडवल करा, दलित नेत्यांना उघडे पाडा, असा नवा अजेंडा घेऊन नक्षलवाद्यांनी दलित चळवळीत घुसण्याचे डावपेच आखले. वर्तमानपत्रांनी त्यावर प्रकाश टाकल्यानंतर विद्रोही, डाव्या आणि आंबेडकरी चळवळीतून प्रतिक्रिया आल्या. मात्र सावध झालेल्या विद्रोहीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी नक्षलवादाची चर्चाही नको, म्हणून विद्रोहीच्या जाहीरनाम्यातून मार्क्‍सलाच हद्दपार करुन टाकले.
 
==विद्रोहीची नव्याने मांडणी==
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील नेते पार्थ पोळके यांनी विद्रोहीची नव्याने मांडणी करणारा जाहीरनामा तयार केला आहे. कोल्हापूर येथे २ व ३ ऑगस्ट २०१४ला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अधिवेशन होत आहे. त्यात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंधश्रद्धा, जातिव्यवस्था, हिंसा, यांचे तात्त्विक व धार्मिक समर्थन करणाऱ्या वैदिक ब्राम्हणी रूढी टाळून स्त्रिया, बहुजन समाज, आदिवासी व भटके- विमुक्त यांच्या सण व उत्सवांना विद्रोही प्रोत्साहन देईल. आदिवासी, भटके, दलित, बहुजनांचे देव आणि दैवते काल्पनिक नाहीत व पारलौकिक नाहीत, ते ऐतिहासिक नायक-नायिका आहेत. त्यांच्या सोबतचे संबंध अनेक रूढी व परंपरांतून व्यक्त होतात. त्यांच्या उपासनेतून अंधश्रद्धा टाळून या दैवतांबद्दल विद्रोहीला आदर आहे, असे नव्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.