"बालगुन्हेगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विविध देशात किती लहान वयात केलेल्या अपराधांना गुन्हा समजायचे त्याचे वेगवेगळे कायदे आहेत. माणसाचे वय ठरविण्याच्यापाा दोन पद्धती आहेत, एक क्रोनॉलॉजिकल आणि दुसरी बायॉलॉजिकल. क्रोनॉलॉजिकल म्हणजे जन्मतारखेपासून मोजायची वर्षे, आणि बायॉलॉजिकल म्हणजे व्यक्तीचे मानसिक वय. मानसिक वय हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर आधारलेले असते. व्यक्ती ज्या परिस्थितीत आहे आणि तिची मानसिक अवस्था कशी आहे यानुसार व्यक्तीत शारीरिक बदल झालेले असतात. त्यामुळे अनेकदा लहान वयाचा माणूस प्रौढ माणसासारखा आणि त्याउलट वयाने मोठा असलेला माणूस लहान मुलासारखा वागत असतो. म्हणून लहान वयात केलेल्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराचे शारीरिक वय न घेता त्याचे मानसिक वय विचारात घ्यावे असे जगात अनेक देशांत मानले जाते. गंभीर गुन्ह्यांचा संदर्भात अपराध्याचे मानसिक वयच विचारात घ्यावे असे भारतीय वैद्यक संघटनेचे म्हणणे आहे.
 
==मुले गुन्हेगार का बनतात? तज्ज्ञांची मते==
; समाजशास्त्रज्ञ‌‌:
समाजशास्त्रज्ञ समजतात की वय नाही तर मुलाची वागणूक अपराधाचे कारण असते. गुंडागर्दी करणे, वाईट लोकांची संगत मिळणे, अश्लील भाषेचा प्रयोग करणे, आईबापांचे न मानणे वगैरे गोष्टी मुलाला अपराधी बनवतात. सामाजिकदृष्ट्या शाळेतून पळून घरी येणे हाही अपराध समजला जातो, परंतु कायद्याच्या दृष्टीने हा अपराध नाही.
 
; मानववंशशास्त्रज्ञ‌‌:
मानववंशशास्त्रज्ञ आणि शरीर वैज्ञानिक समजतात की अपराधाची प्रवृत्ती ही आनुवंशिक, मुलाच्या शरीररचनेनुसार आणि त्याच्या जातिधर्मावर अवलंबून असते. एकसारखी शारीरिक रचना असलेले लोक एकसारखे अपराध करतात, आणि गुन्हेगार जातींशी संबंध असलेले पिढ्यान्‌‌पिढ्या गुन्हेगार असतात. त्यांच्यामध्ये बहुतेक वेळा एकसारखीच अपराधाची प्रवृत्ती असते.
 
; मानसशास्त्रज्ञ‌‌:
मानसशास्त्रज्ञांच्या मते अपराधी प्रवृत्ती वंशावर किंवा शरीररचनेवर अवलंबून नसते. या गोष्टींचे भावना आणि आकांक्षा यांच्याशी काहीही थेट नाते नसते. मूल ज्या वातावरणात वाढते ते वातावरणही गुन्हेगारी प्रवृत्ती असण्याचे कारण नसते. एकाच परिस्थितीत आणि एकाच कुटुंबात वाढलेले सर्व भाऊ-बहीण गुन्हेगार बनत नाहीत.
 
==बाल-अपराध्यांना गुन्हेगार समजण्याच्या विविध देशांतील पद्धती==
Line २२ ⟶ ३२:
;भारत‌‌:
भारतात सात वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलाने केलेल्या कृत्याला अपराधच समजले जात नाही. ७ ते १२ वर्षाच्या मुलाला, त्याने केलेल्या कृत्याच्या परिणामांची जाणीव नसते, या कारणाने त्याने केलेल्या अपराधाबद्दल त्याला सजा होत नाही. यानंतर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलाला किशोर समजले जाते आणि त्याच्या हातून झालेल्या गुन्ह्यासाठी त्याला बालसुधारगृहात पाठविले जाते. २०००सालापर्यंत यासाठी १६ वर्षे वयाची मर्यादा होती.
 
 
(अपूर्ण)