"विलास जैतापकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विलास जैतापकर (जन्म : मुंबई, १४ मार्च १९४८; मृत्यू : मुंबई, ३० एप्रिल...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विलास जैतापकर (जन्म : मुंबई, १४ मार्च १९४८; मृत्यू : मुंबई, ३० एप्रिल २००५) यांना नव्या पिढीचे शाहीर म्हटले जाते. शाहिरी परंपरेचा नंदादीप तेवत ठेवण्यामध्ये शाहीर विलास जैतापकर यांचेही मोठे योगदान होते.
 
विलास जैतापकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची, संगीताची, शाहिरीची ओढ होती. पुढे त्यांनी ‘शाहीर विलास जैतापकर पार्टी’ काढली व गिरगाव, गिरणगावसह मुंबईबाहेरही शेकडो कार्यक्रम केले. जैतापकरांना मराठी भाषा, मराठी आस्मतेचाअस्मितेचा प्रचंड अभिमान होता. ‘युवक बिरादरी’ या सांस्कृतिक संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते.
 
विलास जैतापकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते संत गाडगेबाबा अभियानापर्यंतच्या सामाजिक-राजकीय कार्यांत सतत आघाडीवर असत. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातील ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’ या गीताचे तेच गीतकार होते. गाडगेबाबा अभियानात जैतापकरांनी सादर केलेली ‘स्वच्छतेचा पांडुरंग’ ही कलाकृती महाराष्ट्रात कमालीची गाजली.
 
जैतापकरांचा गणपतीची गाणी लिहिण्यात तर हातखंडा होता. आजही गणेशोत्सवात जैतापकर यांनी लिहिलेली गाणीच प्राधान्याने ऐकायला मिळतात. त्यांच्या सुमधुर गीतांनी रसिकांना, गणेशभक्तांना अक्षरश: वेड लावले होते. आजही ही गीते गणेशोत्सवातले खास आकर्षण असते.
 
[[पछाडलेला (चित्रपट)|पछाडलेला]] या मराठी चित्रपटात जैतापकारांनी रचलेली गीते आहेत. विलास जैतापकरांगीतेजैतापकरांची गीते असलेले ४०हून अधिक आल्बम आहेत आणि त्यांत त्यांची बरीच गाणी आहेत.
 
==विलास जैतापकरांची गीते असलेले आल्बम==
* आली आली भीमाची जयंती
* आली माझ्या घरी ही दिवाळी
* कोकणातील गणपतीच्या पारंपरिक आरत्या
* ग गणपतीचा
* गणपती टॉप १३ (२००९ आणि २०१०च्या आवृत्त्या)
* गणपति राया पडते मी पायां
* टिटवाळ्याचा महा गणपती
* तांडव
* नवरात्रीचे नवरूप
* मला आई व्हायचंय
* माझा लाडाचा गणपती
* माहुरीची रेणुका
* मुंबईचा महाराजा
* लाडाचा गणपती
* लालबागचा राजा
* लालबागच्या राजाचा विजय असो
* वणीची सप्तशृंगी
* विठ्ठल राजा पंढरिचा
* विठ्ठलाचा छंद
* शेगाव गजानन
* सोन्याचा नारल दर्याला
*