"माधव कृष्णराव शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कॅप्टन माधव कृष्णराव शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, क...
(काही फरक नाही)

२३:३६, २६ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

कॅप्टन माधव कृष्णराव शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, कवी, नाटककार, संपादक, समाजसेवक, कवी आणि अभिनेते होते. १९३४साली दत्तू बांदेकर आणि मंडळींनी स्थापन केलेल्या साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळाचे ते एक सक्रिय सदस्य होते. ते ’माधव मिलिंद’या टोपणनावाने कविता लिहीत. मा.कृ. शिंदे हे ’नवमत’ या नवविचार प्रवर्तक मासिकाचे संपादक होते. अनंत गद्रे यांच्या ’निर्भीड’मधूनही ते लेखन करीत असत.

कॅ. मा.कृ. शिंदे यांनी लिहिलेली नाटके

  • आंदोलन (या नाटकात स्वतः मा.कृ. शिंदे यांनी नायकाची भूमिका केली होती.)
  • गृहलक्ष्मी
  • बंडखोर कुमारी
  • बनावट बायको
  • ४२चे आंदोलन
  • शुभं भवतु
  • संत जनाबाई