"गर्वनिर्वाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
हृषीकेश जोशी नाटकाचे दिग्दर्शक आहेत तर, नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.
 
==लोकपाल==
नाटककार [[राम गणेश गडकरी]] यांनी १९०८ साली 'प्रल्हादचरित्र' नावाचे नाटक लिहायला घेतले होते, या नाटकाचे नाव पुढे गडकऱ्यांचे गुरू [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर|श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या]] सांगण्यावरून 'गर्वनिर्वाण' असे करण्यात आले. राम गणेश गडकऱ्यांनी लिहिलेले हे पहिले नाटक होते. त्यात ’लोकपालाचे एक पात्र आहे. 'अमात्य लोकपाल' हा हिरण्यकश्यपूच्या राज्याचा मुख्य प्रशासक आहे. आज लोकपाल बिलामध्ये लोकपालाची जी म्हणून काही 'आदर्श कर्तव्ये' अभिप्रेत आहेत, ती सर्व कर्तव्ये पार पाडणारा, किंबहुना त्याहीपेक्षा सचोटीचा, आत्मभान असलेला लोकपाल या 'गर्वनिर्वाण' नाटकात गडकऱ्यांनी रंगवला आहे. सुरुवातीला अत्यंत जबाबदारीने हिरण्यकश्यपूचा कारभार सांभाळणारा हा लोकपाल, दुरभिमानी, अतिमहत्त्वाकांक्षी आणि अहंमन्य हिरण्यकश्यपूच्या हातून अनाचार घडतोय हे पाहून त्याला सारासार विचार करण्यास सांगतो. नैतिकतेची, सत्याची आणि परिस्थितीची त्याला जाणीव करून देतो. एका महत्त्वाच्या प्रसंगात या लोकपालाच्या तोंडी वाक्य आहे- ''महाराज, लोकपालाचा नेत्र हाच राजाचा नेत्र. लोकपालाने पाहिले, ते राजानेही पाहिले.'' राज्यात प्रजेची मानसिकता काय आहे, राजाने आत्ता कसे वागणे अपेक्षित आहे, हे लोकपाल राजाला सुचवतो, प्रसंगी समजावतो, वादही होतो. आणि शेवटी हिरण्यकश्यपू लोकपालाला राज्यातून हाकलून देतो.
 
भारतामध्ये १९६८ साली न्यायमूर्ती सिंघवी यांनी 'लोकपाल' हा शब्द प्रथम वापरला आणि त्या नावाचे बिल बनले. 'लोकपाल' हा शब्द नक्की कधी अस्तित्वात आला, याबद्दल काही भरवसा देता येत नाही, असे असले तरी गडकऱ्यांनी हा शब्द आधीच वापरला होता, हे यावरून दिसते. भारतात लोकपाल बिलासंदर्भात जे जे म्हणून काही झाले, त्याचे अनेक संदर्भ 'गर्वनिर्वाण' नाटकात दिसतात.
 
==लोकपाल नायक की खलनायक?==
भारतात लोकपाल बिल पास झाल्यानंतर बनलेला पहिला लोकपाल नायक की हे खलनायक याबद्दल जनता साशंक असली किंवा नसली तरी, इ.स. १९१० साली रंगभूमीवर येऊ घातलेल्या ’गर्वनिर्वाण’ नाटकातील नटाला, म्हणजे संस्थानिक असलेल्या नानासाहेब जोगळेकरांना, आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकपालाची भूमिका नको होती. त्यांना 'खलनायक' असलेल्या हिरण्यकश्यपूचीच भूमिका हवी होती. कारण नट म्हणून लोकपालाच्या भूमिकेत फारसे आव्हान नसून, कर्दनकाळ ठरलेल्या हिरण्यकश्यपूची त्याला भुरळ पडली होती, आणि त्यायोगेच त्याला नट म्हणून आपली छाप पाडायची होती.
 
==नाटकाचा बळी आणि पुनर्जन्म==
’गर्वनिर्वाण’च्या कलाकारांत अंतर्गत सुंदोपसुंदी, कलह, हेवेदावे निर्माण झाले होते. वर्ध्यात रंगीत तालमीनंतर रात्री नवख्या नटाकडून गडकऱ्यांचा अपमान झाल्याच्या निमित्ताने कलाकारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि गडकऱ्यांच्या नाट्यरूपी पहिल्या अपत्याचा, म्हणजे 'गर्वनिर्वाण'चा, बळी पडला. शेवटी या नाटकाचा पुनर्जन्म होण्यासाठी २०१४ हे साल उजाडावे लागले.
 
== संदर्भ आणि नोंदी ==