"शोभा प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शोभा किशोर प्रधान (माहेरच्या शोभा व्यंकटेश वकील) या एक मराठी अभिन...
(काही फरक नाही)

२२:२८, ३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

शोभा किशोर प्रधान (माहेरच्या शोभा व्यंकटेश वकील) या एक मराठी अभिनेत्या आणि लेखिका आहेत. त्यांचा जन्म : २२ जुलै १९४४चा. त्यांचे लहानपण मुंबईच्या गोवालिया टँक या गुजराथीबहुल भागात गेले. त्यांचा आदी मर्झबान यांच्यासारख्या दिग्दर्शकाशी ’इंडियन नॅशनल थिएटर’द्वारा संबंध आला. त्यांच्याबरोबर त्यांनी काही गुजराथी नाटकांत कामे केली. मराठी नाटके आणि चित्रपट यांमध्येही त्या छोट्यामोठ्या भूमिका करत.

गोवालिया टँक भागातून बांद्रा येथे रहावयास आल्यावर त्यांना, तिथल्या वसाहतीत राहणाऱ्या किशोर प्रधान हे बसवत असलेल्या ’तीन चोक तेरा’ या नाटकाच्या नायिकेच्या भूमिकेसाठी विनंती करण्यात आली. व्यंकटेश वकील यांनी आपल्या मुलीला म्हणजे शोभाला त्या नाटकात काम करण्याची परवानगी दिली. बांद्रा येथील त्या वसाहतीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलमध्ये झालेला नाटकाचा तो यशस्वी प्रयोग पाहून, लेखक श्याम फडके खुश झाले,आणि त्यांनी किशोर प्रधान आणि शोभा वकील यांच्यासाठी ’काका किशाचा’ हे नाटक लिहून दिले. ’काका किशाचा’ खूप गाजले, आणि पुढील काळात शोभा वकील या किशोरशी लग्न करून २३ ऑक्टोबर १९६६ला शोभा प्रधान झाल्या.

शोभा प्रधान यांनी भूमिका केलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)

  • काका किशाचा (लिली)
  • चंद्र नभीचा ढळला (राजकन्या)
  • डंख (शोभा)
  • तात्पर्य (नायिका)
  • तीन चोक तेरा (स्वरूपा व श्यामला)
  • देव नाही देव्हाऱ्यात (जानकी)
  • पतित एकदा-पतित का सदा? (डबलरोल)
  • राणीचा बाग (विमल)
  • रात्र थोडी सोंगं फार (विभावरी व माधुरी)
  • लग्नाची बेडी (रश्मी)
  • लागेबांधे (नर्स-नायिका)
  • लैला ओ लैला (लैला)
  • शतानिक (हेमदत्ता)
  • संभव-असंभव (शोभा ठाकूर)
  • सारेच सज्जन (शैला)
  • हँड्‌स अप