"माधुरी तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी लेखिका
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: माधुरी तळवलकर या एक मराठी लेखिका आहेत. अनेक वर्षी त्यांनी सातत्य...
(काही फरक नाही)

००:३१, ३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

माधुरी तळवलकर या एक मराठी लेखिका आहेत. अनेक वर्षी त्यांनी सातत्याने विविध प्रकारचे लेखन केले आहे. अंतर्नाद, अनुभव, मिळून सार्‍याजणी इत्यादी मासिकांतून त्यांची विविध प्रकारच्या पुस्तकांवरील आस्वादक समीक्षा प्रकाशित होत असते.

पुण्यातील कर्वे रोड येथे एका कार्यालयात जेव्हा त्या काम करीत होत्या,. तेव्हा त्या कोथरूडच्या गांधी भवनजवळ अंध मुलींच्या शाळेत आणि वसतिगृहात जाऊन मुलींनी गोष्टी सांगत असत.

माधुरी तळवलकर यांची पुस्तके

  • कळत जाते तसे (कथासंग्रह)
  • कॉल सेंटर डॉट कॉम (कादंबरी)
  • कावळीणबाई आणि तिची पिल्ले (बालसाहित्य)
  • ज्याचं त्याचं आभाळ (कादंबरी)
  • व्यक्तिमत्त्व फुलताना (माहितीपर) : या पुस्तकाला व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ.प्र.चिं. शेजवलकर यांची प्रस्तावना आहे. पुस्तकात वेळव्यवस्थापन, ताणतणावांवर मात, वक्तृत्व इत्यादी विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले आहे.