"कृष्णाजी केशव कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''कृष्णाजी केशव कोल्हटकर''' (जन्म : सातारा, १४ जानेवारी, १८८३; मृत्यू...
(काही फरक नाही)

१९:१०, २५ मार्च २०१४ ची आवृत्ती

कृष्णाजी केशव कोल्हटकर (जन्म : सातारा, १४ जानेवारी, १८८३; मृत्यू : पुणे, २६ एप्रिल १९७५) हे एक मराठी वेदान्ती आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण घेतल्यावर डोळे बिघडल्यामुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. त्यांनी सातारा येथे जिल्हा न्यायालयात १९०१ साली कारकुनाची नोकरी धरली. १९१३ साली ही नोकरी सोडोन ते त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या ’वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युअरन्स’ कंपनीत लागले. येथे त्यांना अधिकारीपदापर्यंत बढती मिळाली.