"प्रफुल्ला डहाणूकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

चित्रकार
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रफुल्ला डहाणूकर (जन्म : गोवा, १ जानेवारी, इ.स. १९३४; मृत्यू : मुंबई,...
(काही फरक नाही)

००:१५, ६ मार्च २०१४ ची आवृत्ती

प्रफुल्ला डहाणूकर (जन्म : गोवा, १ जानेवारी, इ.स. १९३४; मृत्यू : मुंबई, १ मार्च, इ.स. २०१४) या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्‍स सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या.

प्रफुल्लाबाईंचे कला शिक्षण मुंबईच्या ’जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये झाले. इ.स. १९५५मध्ये जेजेमधून सुवर्णपदक मिळवून कलापदवीधर झाल्यानंतर डहाणूकर फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळवून पॅरिसला चित्रकलेच्या अधिक शिक्षणासाठी १९६१मध्ये गेल्या, आणि शिक्षण पूर्ण करून परत भारतात आल्या..त्या भित्तिचित्रांमध्ये खास प्रवीण होत्या. भारतामध्ये अशा चित्रांसाठी त्यांनीच पहिल्यांदा रोलरचा वापर सुरू केला.


(अपूर्ण)