"विनता जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शाहीर विनता जोशी या वि.दा. सावरकरांचे धाकटे भाऊ नारायण स...
(काही फरक नाही)

१६:४३, २७ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

शाहीर विनता जोशी या वि.दा. सावरकरांचे धाकटे भाऊ नारायण सावरकर यांच्या नात (कन्येच्या कन्या). माहेरच्या विनता काळे. राहणाऱ्या मूळच्या नाशिकच्या. शाळेत दहावीच्या वर्गात असल्यापासूनच् विनता जोशी पोवाडे गायल्या लागल्या. आज "अनादी मी अनंत मी", शस्त्रगीत, हिंदू एकता गीत अशी अनेक वीरगीते, सावरकरांचा पोवाडा, शिरीष कुमार, झाशीची राणी, तानाजीवर रचलेला पोवाडा असे अनेक पोवाडे त्या, दमदार, बुलंद आवाजात, डोक्यावर फेटा आणि हातात डफ अशा पुरुष शाहिराला लाजवेल अशा आवेशात पोवाडेा सादर करतात.

आजवर विनता जोशी यांचे अनेक ठिकाणी, ५००हून अधिक पोवाड्यांाचे कार्यक्रम झाले आहेत. ओझर, कळवण, डोणजे फाटा, पिंपरी, मनमाड, किल्ले रायगड, लासलगाव, सिन्नर, सैद, अशा खेडगावांतून, तसेच अभोणा, कनाशि , खोडाळा, चणकापूर, मोखाडा, अशा अनेक आदिवासी भागातून हिंदु जनजागरणच्या निमित्ताने विनता जोशी यांनी पोवाड्यांचेे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.

पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधे झालेल्या कार्यक्रमात विनताच्या पोवाड्यांनी सर्वांना भारावून टाकले होते.

पु.ल.देशपांडे, बाळासाहेब देवरस, हिंदु महासभेचे नेते विक्रम सावरकर, शंकर अभ्यंकर अशा अनेक मान्यवरांकडून विनताला कौतुकाची थाप मिळाली आहे. .शंकर अभ्यंकरांच्या व्याख्यानमालेत विनता जोशी यांनीे सावरकरांचा पोवाडा गाऊन, त्यांच्या कडून शाबासकी मिळवली होती. अल्फा टीव्ही मराठी, दूरदर्शनवर देखील त्यांच्या कार्यक्रमांची आवर्जून दखल घेतली गेली. पुण्यातल्या सावरकर स्मृती स्मारकाच्या उदघाटन प्रसंगी बाबासाहेब पुरंदरे यांच्याा हस्ते मानचिन्ह देऊन विनता जोशी यांना गौरवण्यात आले होते.


यू ट्यूबवर विनता जोशी