"रत्‍नाकर बापूराव मंचरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख र.बा. मंचरकर वरुन रत्नाकर बापूराव. मंचरकर ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. डॉ. रत्‍नाकर बापूराव तथा र. बा. मंचरकर (जन्म : १९४३; निधन : अहमदनगर, १२-२- २०१२) हे मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक होते. अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे ते निवृत्त उपप्राचार्य होते.
 
प्रा. मंचरकर हे समीक्षक, साहित्यसंशोधक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. व्यासंग करून व ३७ पेक्षा अधिक ग्रंथलेखन करून त्यांनी ही मान्यता मिळवली होती. समीक्षाक्षेत्रात त्यांचा विशेष दबदबा होता. संत साहित्याचे संशोधन करून त्यांनी त्याचाही गाढा व्यासंग केला होता. धर्म आणि संप्रदाय, साहित्य समीक्षा प्रदीप, मुक्तेश्वरकृत महाभारत - एक अभ्यास असे अनेक संशोधनपर ग्रंथ त्यांनी लिहिले. महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्कारासह ग्रंथलेखनासाठी असलेले अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.
 
बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, यशवंत मनोहर, भास्कर चंदनशिव, लहू कानडे अशा अनेकांच्या साहित्यावर लिहून त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न डॉ. र.बा. मंचरकरांनी केला. त्यासाठी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने त्यांना त्यांच्या निवासस्थानी येऊन पुरस्कार देण्यात आला होता. (२९-१२-२०११).
 
मंचरकरांच्या नावाने अहमदनगर येथे ’डॉ. र.बा. मंचरकर स्मृति प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानतर्फे संत साहित्यावरील ग्रंथलेखनासाठी डॉ. र.बा. मंचरकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. डॉ. [[विलास खोले]] यांना २०१४साली हा पुरस्कार देण्यात आला.
 
==डॉ. र.बा. मंचरकर यांनी लिहिलेले किंवा संपादित केलेले ग्रंथ ==