"उल्हास बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पंडित उल्हास बापट (जन्म : १९५०) हे एक मराठी संतूरवादक आहेत. त्यां...
(काही फरक नाही)

१७:२३, ३१ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

पंडित उल्हास बापट (जन्म : १९५०) हे एक मराठी संतूरवादक आहेत. त्यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले.

पुरसे तबलाशिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले. दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. इतक्या विविध अनुभवांनंतर उल्हास बापट यांना, आपल्याला संतूर या वाद्यात रस असल्याचा शोध लागला, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले.

१९७५मध्ये पंडित रविशंकर यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ’संचरिणी’तील खासगी बैठकीत उल्हास बापट यांनी आपले वादन श्रोत्यांपुढे पहिल्यांदा सादर केले.

आज उल्हास बापट हे जगातल्या उत्कृष्ट संतूर वादकांपैकी एक आहेत. संतूरच्या तारा जुळविण्यासाठी ’क्रोमॅटिक सिस्टिम’(फिक्स्ड ट्यूनिंग) वापरणारे ते एकमेव वादक आहेत. भारतात नाही तर जगातील अनेक देशांत उल्हास बापट यांच्या संतूरवादनाची कीर्ती पसरली आहे. त्यासाठी बापट यांनी १९८८पासून कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंडचे दौरे केले आहेत. पंडित नारयण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत.

पंडित उल्हास बापट यांचे भारतातील अनेक संगीतसमारोहांत कार्यक्रम झाले आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील अनेक गीतांत आणि पार्श्वसंगीतात उल्हास बापट यांचे संतूर वाजते. संगीत दिग्दर्शक शारदापासून आत्तापर्यंतच्या बहुतेक संगीत दिग्दर्शकांनी बापटांच्या संतूरचा उपयोग करून घेतला आहे. ’घर’पासूने ते ’१९४२ ए लव्ह स्टोरी’ आणि ’जैत रे जैत’, या चित्रपटांत आणि आशा भोसले यांच्या ’ऋतु हिरवा’ या आल्बममध्येदेखील उल्हास बापट यांच्या संतूर वादनाचा वापर झाला आहे.

संतूर

संतूर हे मुळात लोकसंगीतात उपयोगी पडणारे एक वाद्य. त्याला शंभर तारा असतात. त्याच्यावर संशोधन करून शिवकुमार शर्मा यांनी आणि त्यांनंतर काही वादकांनी त्या वाद्याला शास्त्रीय संगीतासाठी सज्ज केले.


(अपूर्ण)