"विष्णुशास्त्री वामन बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
'''विष्णुशास्त्री वामन बापट''' (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, [[मे २२]], [[इ.स. १८७१]]; मृत्यू : [[डिसेंबर २०]], [[इ.स. १९३२]]) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.
 
==शिक्षण==
विष्णुशास्त्री बापट यांचे इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण रामदुर्ग, शिरोळ आणि मिरज येथे झाले. त्यानंतर त्यांनी तारमास्तराच्या कामाचे ज्ञान मिळविले; निरनिराळ्या रेल्वे कार्यालयांतून नोकऱ्या केल्या. त्या करीत असतानाच संस्कृतच्या अभ्यासाची ओढ निर्माण झाल्यामुळे संस्कृत शिकले व वाई येथील प्रज्ञानंद सरस्वतींकडे सुमारे अकरा महिने राहून त्यांनी वेदान्ताचे अध्ययन केले. अध्ययनकाळात चरितार्थासाठी वाईच्या मोदवृत्त छापखान्यात मुद्रितशोधकाची नोकरी केली.
 
==कारकीर्द==
त्यानंतर आताच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथील पाठशाळेत इ.स. १९०३ ते १९१२ पर्यंत शास्त्री म्हणून नोकरी करीत असताना, '''विष्णुशास्त्री बापट''' यांनी, सुमारे ७५ आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिक संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे, आपल्या विवेचक प्रस्तवनांसह प्रसिद्ध केली. पुढे पुण्यात आल्यावर त्यांनी ग्रंथप्रकाशनाचा व्यवसाय केला; आचार्यकुल नावाची अध्यापनसंस्था स्थापन केली. याच आचार्यकुलात [[कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर]] यांनी तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] [[गीतारहस्य|गीता रहस्यातील]] कर्मयोगसिद्धान्त हा शांकरमतास सोडून असल्याने त्या ग्रंथाचे बापटांनी खंडन केले. त्यांनी आयुष्यभर [[शंकराचार्य]]प्रणीत [[अद्वैत]] सिद्धान्ताचे समर्थन आणि प्रसार करून तसे करणाऱ्या ग्रंथांचे लेखन केले. असा प्रसार करणे हे बापटांचे जीवितकार्य होते. वैदिक धर्माचा अभिमान असलेले दानशूर व्यापारी विठ्ठलदास दामोदर ठाकरसी ह्यांचे बापटांना मोलाचे साहाय्य झाले.
 
बापटशास्त्री यांनी धर्मराजा ध्वरींद्रकृत वेदान्तपरिभाषा
ह्या ग्रंथाच्या विवरणाचे तसेच वेदान्त शब्दकोशाचे कामही त्यांनी हाती घेतले होते. तथापि ते त्यांच्याकडून अपूर्ण राहिले. ह्या दोन्ही कामांचा उर्वरित भाग रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर ह्यांनी पूर्ण केला आणि वेदान्तपरिभाषा व वेदान्तशब्दकोश हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९३३).
 
==विष्णुशास्त्री बापट यांचे साहित्य==
* आचार्य (पाक्षिक)
* आचार्यकुल नावाचे पाक्षिकमासिक (इ.स. १९१४पासून पुढे)
* ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (इ.स. १९१२पासून पुढे दरमहा)
* दर्शनमाला (इ.स. १९१४पासून पुढे क्रमश:)
Line २४ ⟶ ३१:
* ऋग्वेद
* ऐतरेयोपनिषद्भाष्यार्थ
* कथासरित्सागर खंड १ ते ४ (मूळ लेखक सोमदेव)
* काठकोपनिषद्भाष्यार्थ
* केनोपनिषद्भाष्यार्थ
* चार्वाक दर्शनसार (मूळ लेखक चार्वाक)
* छांदोग्यपनिषद्भाष्यार्थ
* तत्त्वानुसंधानसार अर्थात्‌ सुबोध अद्वैत सिद्धान्त दर्शन
Line ४४ ⟶ ५१:
* योगवासिष्ठ भाग १ ते ३ (मूळ लेखक वाल्मीकि ऋषी)
* योगवासिष्ठ सार
* वेदान्त परिभाष्यार्थ (मूळ लेखक धर्मराजा ध्वरींद्र)
* वेदान्तप्रस्थानत्रय
* वेदान्त शब्दकोश (अपूर्ण)
* शतश्लोकी (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
* शिवमहिम्न - मराठी विवरण
* श्री जैमिनी अश्वमेघ (मूळ लेखक जैमिनी)
* श्रीतार्क संग्रहसार
* भगवद्गीताभाष्यार्थ
Line ५५ ⟶ ६३:
* श्री शुकचरित्र
* श्री सार्थ मनुस्मृती
* श्रीमाहेश्वरदर्शनसार (मूळ लेखक महेश्वर)
* श्री रामानुजनरामानुज दर्शनसार (मूळ लेखक रामानुज)
* सान्वयार्थ सविवरण पंचदशी भाग १, २
* सार्थ कपिलगीता (मूळ लेखक कपिलमुनी)
* सुबोध उपनिषत्संग्रह
* सुबोध पंचदशी
Line ७९ ⟶ ८७:
==दर्शनमाला==
या नियतकालिकाद्वारे विष्णुशास्त्री बापटांनी चार्वाक, बौद्ध, जैन (नास्तिक), न्याय आणि सांख्य आदी दर्शनग्रंथांचा त्यांच्या खंडणासह साररूपात परिचय करून दिला.
 
==पुरस्कार==
हंपी मठाधिपतींकडून ‘आचार्यभक्त’ आणि बनारस येथील श्रीभारतधर्ममहामंडळातर्फे ‘शास्त्रसुधाकर’ अशा सन्मानाच्या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या.