"एव्हरेस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३०:
== नाव ==
[[चित्र:MountEverestRelief.png|thumb|left|320px|एव्हरेस्ट भौगोलिक]]
नेपाळी भाषेत एव्हरेस्टचे नाव सगरमाथा असे आहे. हा शब्द संस्कृत शब्द स्वर्गमाथाचा अपभ्रंश आहे. तिबेटियन भाषेत त्याला चोमोलुंग्मा (विश्वाची माता) असे आहेम्हणतात. चिनी भाषेत ''Zhūmùlǎngmǎ Fēng'' (珠穆朗玛峰) असे आहे.
 
[[चित्र:GeorgeEverest.jpeg|thumb|सर जॉर्ज एव्हरेस्ट]]
सर [[जॉर्ज एव्हरेस्ट]] हे १८४० मध्ये ब्रिटिश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्ट यांनी १८४१ मध्ये या पर्वत रांगांना अतिउंच रांगांमध्ये समाविष्ट केले. पहिल्या प्रथम याला ''पीक बी'' असे नामकरण केले. १८४८ मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पीक XV असे नामकरण केले. [[कांचनगंगा]] पर्वताला तोवर सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. ॲन्ड्‌ऱ्यू वॉ यांनी सर्वेक्षण उपकरणे वापरून शिखराच्या उंचीची प्राथमिक मोजणी केली व त्यानंतर १८५२ मध्ये [[डेहराडून]] व [[कोलकाता]]मधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पीक XV ची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व त्‍यावर सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले.<ref>G. O. Dyhrenfurth: Zum Dritten Pol. München, 1952, S. 27ff</ref> १८५६मध्ये एव्हरेस्ट यांच्या कनिष्ठांनी या शिखराचे नाव माउंट एव्हरेस्ट ठेवावे असे सुचविले.
 
[[चीन]], [[तिबेट]] व [[नेपाळ]] यांनी आपापल्या परीने एव्हरेस्टला फक्त त्यांच्या नावाने संबोधले जावे असे प्रयत्न केले. परंतु इतर सर्व देशांत शिखराला एव्हरेस्ट याच नावाने ओळखले जाते. या शिखराचे नाव बदलून त्याची अचूक उंची मोजणाऱ्या [[राधानाथ सिकदार]] याचे नाव शिखराला द्यावे, असा एक ठराव, अटल बिहारी बाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना विचारात घेतला गेला होता. पण तो पसार होण्यापूर्वीच भारताचे पंतप्रधान बदलले.
 
== मोजमाप ==