"बळवंत मोरेश्वर पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
'''
== जीवन ==
त्यांचेबळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव [[पुणे]] जिल्ह्यातील [[सासवड]] होते. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली.
 
पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व [[राजा शिवछत्रपती (पुस्तक) |राजा शिवछत्रपती]] हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल, इ.स. १९८४रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात..
 
इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघा]]शी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते ’माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व [[कादंबरी]]कार गो.नी.दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही. जिथेजिथे शिवाजीचे पाऊल पडले होते तिथेतिथे बाबासाहेब पुरंदरे जाऊन आलेले आहेत. शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब हे एकच. स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब [[सुधीर फडके]] यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.
 
[[प्रल्हाद केशव अत्रे]], [[गो. नी. दांडेकर]], [[पु.ल. देशपांडे]], [[अटलबिहारी वाजपेयी]], मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला, लाभतो आहे. या सर्वांच्या माध्यमातून, सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. शिवचरित्रशिवाजीचे चरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत आपल्या व्याख्यानांमधून पटवून दिले.
 
इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवाजीभक्तांच्या गुरुस्थानी आहेत.
 
’बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ.सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लेटर्स या मानद पदवीने सन्मानित केले आहे.
 
==बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तके==
* आग्रा
* कलावंतिणीचा सज्जा
* जाणता राजा
* पन्हाळगड
* पुरंदर
* पुरंदरच्या बुरुजावरून
* पुरंदऱ्यांचा सरकारवाडा
* पुरंदऱ्यांची नौबत
* प्रतापगड
* महाराज
* मुजऱ्याचे मानकरी
* राजगड
* राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
* लालमहाल
* शिलंगणाचं सोनं
* शेलारखिंड
* सावित्री
* सिंहगड
 
==ध्वनी फिती==
* बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन - भाग १, २, ३ (कॅसेट्‌स आणि सीडीज)
* शिवचरित्र कथन भाग १ ते १५ कॅसेट्‌सचा आणि सीडीजचा सेट
 
== चित्रदालन ==