"शनिवार वाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
 
* {{इतिहासलेखन}}
 
[[Image:Pune ShaniwarWada DelhiGate.jpg|thumb|right|180px|शनिवार वाड्याच्या 'दिल्ली दरवाजा'चे दृश्य]]
'''शनिवार वाडा''' (बोली मराठीत शनवारवाडा) ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. [[इ.स.चे १८ वे शतक|इ.स.च्या १८व्या शतकात]] हा वाडा [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान, अर्थात [[पेशवे]] यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकरने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan00013.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनवार वाड्याची वास्तुशांत करण्यात आली. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ च्या पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.
 
शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली.
 
== इतिहास ==
Line १४ ⟶ १९:
 
एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो."{{संदर्भ हवा}}.
 
==शनिवारवाड्याचे सांगलीचे कवी साधुदास यांनी केलेले वर्णन==
शनिवारवाडयाचे वर्णन सांगलीचे प्रसिद्ध कवि साधुदास यांनी आपल्या ‘पौर्णिमा’ नामक कादंबरीत केले आहे. त्यावरुन वाड्याचे समग्र चित्र डोळ्यांसमोर उभे रहाते. ‘सभोवार एक प्रचंड तट राखून वाड्याचे बांधकाम केले होते. वाडयाकरिता आणि भोवतालच्या बागेकरिता मिळून तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली होती. वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पाच दरवाजे होते. उत्तरेकडेचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी (अल्लीबहाद्दरा) चा दरवाजा, दक्षिणेकडचा आग्नेय व नैर्ऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नावांचे दरवाजे, आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा, अशा नावांनी हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाज्यांवर अष्टौप्रहर गारद्यांचा जागता पहारा असे.<br />
दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरूज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे. बुरुजाच्या आत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. ही इमारत सहा मजली असून तिचे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, पण तो बाहेरील चौक या नावानेही ओळखला जाई. नैर्ऋत्येकडील चौकास मोतीचौक असे म्हणत. त्या चौकाला बाईंचा (गोपिकाबाई) चौक असेहीम्हणत. वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असे नाव असून तो मधला चौक या नावाने ओळखला जात असे.
शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक ही संज्ञा असून त्याला हौदाचा चौक म्हणत. <br />
या मोठया चौकांतून फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना, वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादी कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकांतून करण्यात आली होती. कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळविले होते.
 
‘वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याचा घेर सुमारे ऐशी फूट होता. त्त्यात सोळा पाकळया असून प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणें सर्व पाकळ्यांत मिळून दोनशे छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचे असून त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालने काढलेली होती. सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावर पक्षी, फअले, वेलबुट्टी वगैरे चित्रे कोरलेली होती.. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपतिमहालाचे चित्रकाम फारच प्रेक्षणीय होते. त्यांत रामायण-महाभारतांतील अनेक कथांची चित्रे होती. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याजकडून हेचित्रकाम तयार करून घेण्यात आले होते. यावरुन हा वाडा सजविण्यासाठी किती पैसा खर्च करण्यांत आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा."
 
==पुस्तके==
शनिवारवाड्याचा इतिहास आणि अंतर्गत रचना सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांतली काही अशी:-
* शनिवारवाडा : लेखक [[प्र.के. घाणेकर]]
* शनिवारवाडा : लेखक डॉ. गणेश हरी खरे
* पुण्याचा शनिवारवाडा : लेखक रमेश जि. नेवसे
* शनिवारवाडा (ललित कादंबरी) : लेखक वा.ना. शहा
 
== चित्रदालन ==