"दत्तात्रेय गणेश गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख द.ग. गोडसे वरुन दत्तात्रेय गणेश गोडसे ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==बालपण आणि शिक्षण==
द.ग.गोडसे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील वाधोडे येथे झाला, शालेय शिक्षण सावनेरलाआणि कॉलेज शिक्षण नागपूरच्या मॉरिस आणि नंतर मुंबईच्या विल्ससन कॉलेजातून घेतले. त्यांनी ’स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट’मधून ललितकलेचे प्रिशिक्षणही घेतले.
 
गोडसे यांनी मराठीत अनेक विषयांवर लिखाण केले. शिवाजी-मस्तानी-रामदास या ऐतिहासिक व्यक्तींवर, मराठी वाङ्‌मय-नाटकांवर, चित्रकला-शिल्पकला-वास्तुकलांवर आणि अगदी बुद्धकालीन स्थापत्यावर गोडसे लिहीत असत. थॉमस डॅनियल ने इ.स. १७९० साली पेशव्यांच्या दरबाराचे एक रंगचित्र काढले होते. त्यावरही गोडसेंनी एक लेख लिहिला होता.
 
 
 
द.ग. गोडसे यांनी आपल्या चित्रांनी अनेक मासिके आणि पुस्तके सजवली. १०७हून अधिक नाटकांचे ते नेपथकार होते. तीन मराठी आणि दोन हिंदी चित्रपटांचे ते कलादिग्दर्शकही होते.
 
द.ग. गोडसे यांच्याविषयी वाङ्मयशास्त्रविद्‌, भाषाशास्त्री आणि चिन्हाभ्याशास्त्रतज्ज्ञ अशोक रा. केळकर यांनी लिहिले आहे, "गोडसे यांचे कलेच्या इतिहासासंबंधीचे लिखाण क्वचित विवाद्य असले तरी जीववादाच्या दृष्टिकोनातून अतिशय मोलाचे आहे." गोडसे यांनी केवळ मराठीतच लिहिण्याचे जे ठरविले, त्यामुळे मराठी वाचकांना अपरिमित लाभ झाला आहे."