"अप्सरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 24 langlinks, now provided by Wikidata on d:Q148773
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{विस्तार}}
 
हिंदू पुराणांनुसार '''अप्सरा''' या स्वर्गाधिपती [[इंद्र|इंद्राच्या]] दरबारात नृत्यगायन करणाऱ्या स्वर्गीय सुंदऱ्या होत्या. [[ऋग्वेद|ऋग्वेदानुसार]] काही अप्सरा या [[गंधर्व|गंधर्वांच्या]] पत्‍नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांची नैतिक मूल्ये अप्सरांना बंधनकारक नसावीत असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टांपासून त्यांना दूर सारण्यासाठी देवराज [[इंद्र]] या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात. अप्सरा सदैव तरुण असतात, त्यांना वृद्धत्व नाही.
 
[[भागवत पुराण|भागवत पुराणानुसार]] [[कश्यप|कश्यप ऋषींच्या]] बारा पत्‍नींपैकी '''[[मुनि]]'''(ऊर्फ वसिष्ठा) ही पत्‍नी बऱ्याच अप्सरांची माता असल्याचे दिसते. अन्य पौराणिक वाङ्‌मयात कश्यपाच्या '''[[अरिष्टा]]'''(ऊर्फ प्राधा), ताम्रा व '''[[खशा]]''' यानामक बायकापत्नी काही अप्सरांच्या आई असल्याचे उल्लेख आढळतात. काही कथांमध्ये स्वतः ब्रह्मदेवाने अप्सरांची निर्मिती केल्याचेकेल्याचेही वाचायला मिळते. याशिवाय, मेरु पर्वताची रवी करून केलेल्या समुद्रमंथनातून 'रंभादि देवांगना' निघाल्याचा उल्लेखही सापडतो.
 
[[चित्र:Apsara relief.jpg|thumb|right|[[आंग्कोर वाट]] मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या अप्सरा]]
पुराणकथा व [[नाट्य शास्त्र|नाट्य शास्त्राच्या]] आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत -
 
अजगंधा, अनपाया, अद्रिका, अनवद्या, अनुचना, अंबिका, अरूणाअरुणा, अरूपा, अलंबुषा, अल्मविशा, असिता, असिपर्णिनी, असुरा, आलंबा, उत्कचोत्कृष्टा, उमलोचा, उर्वशी, ऋतुस्थला, कपिला, कर्णिका, काम्या, केशिनी, गुणमुख्या, गुणवरा, घृताची, चारुनेत्री, चित्रलेखा, तिलोत्तमा, देवी, नागदंता, निर्‌ऋता, पंचचूडा, पुंजिकस्थला, पुंडरीका, पूर्वचित्ती, पौलोमी, प्रभावती(ऊर्फ स्वयंप्रभा), बुदबुदा, भासी, मनु, मनोभवा, मनोरमा, महाभागा, मारीचि, मार्गणप्रिया, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, मंजुघोषा, रंभा, रक्षिता, रितुशाला, लता, लक्ष्मणा, वपु, वरंवरा, वर्गा, वंशा, विद्युता, विद्युत्पर्णा, विद्युत्प्रभा, विमनुष्या, विश्वची, शरद्वती, शिवा, शुचिका, शुचिस्मिता, शुची, समिची, सहजन्या(सहजिन्यु), सुगंधा, सुदती, सुप्रिया, सुबाहु, सुभगा, सुरजा, सुरता, सुरसा, सुलोचना, सोमा, सौदामिनी, सौरभेदी, स्वयंप्रभा(ऊर्फ प्रभावती), स्वर्णा, हासिनी, हिमा, हेमा, क्षेमा, वगैरे. या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो.
 
इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी [[उर्वशी]], [[मेनका]], [[रंभा]] व [[तिलोत्तमा]] या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/अप्सरा" पासून हुडकले