"शरदचंद्र मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''शरदचंद्र मराठे''' (जन्म : सिद्धेश्वर-महाराष्ट्र, इ.स.१९१९; मृत्यू : ...
(काही फरक नाही)

१४:४०, १२ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

शरदचंद्र मराठे (जन्म : सिद्धेश्वर-महाराष्ट्र, इ.स.१९१९; मृत्यू : कोझिकोड-केरळ, ७ ऑगस्ट, इ.स.२०१३) हे एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. त्यांचा जन्म सिद्धेश्वर या हिगोली जिल्ह्यातील गावी हा जिल्हा पूर्वी परभणी जिल्ह्याचा भाग होता. त्यांच्या पत्नीचे नाव मनीषा.

शरदचंद्र मराठे संगीत शिकविण्याकरिता ते इ.स.१९५१मध्ये केरळात गेले आणि तेथेच स्थायिक झाले. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने कोझिकोड येथे निधन झाले. त्यांनी कर्नाटक संगीतपद्धतीने गायलेल्या भक्तिरचना ’संगीतपुष्पांजली’ या मल्याळी भाषेतील पुस्तकात समाविष्ट आहेत. मराठे यांनी काही मल्याळी चित्रपटांना संगीत दिले होते.

पुरस्कार

  • शरदचंद्र मराठे यांना केरळ संगीत अकादमीचा गुरुपूजा पुरस्कार मिळाला होता.
  • शिवाय महंमद रफी पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारही.