"अपर्णा अतुल घाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कोल्हापूर येथे राहणाऱ्या अपर्णा अतुल घाटे (माहेरच्या अपर्णा रमे...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१९:०५, ३० जुलै २०१३ ची आवृत्ती

कोल्हापूर येथे राहणाऱ्या अपर्णा अतुल घाटे (माहेरच्या अपर्णा रमेश कुलकर्णी), या एक मराठी लेखिका आहेत. त्या एम.ए. झाल्या असून सध्या(मार्च २०१३) त्या ’संत श्रीदेवनाथ महाराज : व्यक्ती वाङ्मय आणि कार्य’ या विषयावर प्रबंध लिहीत आहेत. अपर्णा घाटे यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीची बरीच गौरवपत्रे प्राप्त झाली आहेत.

अपर्णा घाटे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अनिवासी (कादंबरी)
  • अनुबंध (कादंबरी)
  • टुरिस्ट व्हिसा (कादंबरी)
  • सय (कवितासंग्रह)
  • संवेदना (कथासंग्रह)

अप्रकाशित (मार्च२०१३) साहित्य

  • ध्यास (तीन अंकी नाटक)
  • मी आहे (तीन अंकी नाटक)

पुरस्कार

  • अनुबंध या कादंबरीस केशर वाङ्मय पुरस्कार
  • जी.ए. कुलकर्णी कथा पुरस्कार
  • ’प्रौढ साक्षरता निरंतर’चा पुरस्कार
  • सय या कवितासंग्रहास औरंगाबादच्या जीवन विकास ग्रंथालयाचा काव्यकृती पुरस्कार
  • ’संवेदना’ कथासंग्रहास डॉ. मो.स. गोसावी साहित्य पुरस्कार.