"शैला लोहिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. शैला द्वारकादास लोहिया -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. या मू...
(काही फरक नाही)

२२:३०, २९ जुलै २०१३ ची आवृत्ती

डॉ. शैला द्वारकादास लोहिया -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षात गेले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेऊन राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजावून देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला.


लग्नानंतर डॉ. शैला लोहिया आपल्या डॉक्टर पतीबरोबर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईयेथे आल्या. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता. त्यांना अनुसरून, डॉ. शैला द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई ही आयुष्यभर आपली कर्मभूमी मानली. लग्नानंतर, शैला लोहिया अंबाजोगाई येथील योगेशरी महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करू लागल्या. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधावर बरेच लेखन केल्यावर, त्यांना ’भूमी आणि स्त्री’ या वेगळ्याच विषयावर प्रबंधलेखन करून पीएच.डी मिळाली.

डो. शैला लोहिया यांचे समाजकार्य

  • ’भारत जोडो’ या चळवळीत सहभाग (१९८४-८५)
  • आंतरराजीय विवाहांना सक्रिय पाठिंबा आणि त्यासाठी आवश्यक ते समुपदेशन
  • घरातच कार्यालय असलेल्या ’मानवलोक’ संस्थेची उभारणी (इ.स.१९६५)
  • ’मनस्विनी’ आणि ’धडपड’ याही संस्था उभारल्या.(इ.स.१९९८). ’मनस्विनी’तर्फे गृहपदार्थांची निर्मिती आणि ’धडपड’तर्फे पापड बनविण्याचा व्यवसाय अंबाजोगाईच्या स्त्रिया आजही व्यवस्थित सांभाळत आहेत.
  • ’युक्रांद-संघर्ष वाहिनी’, ’राष्ट्र सेवा दल’, ’दलित युवक आघाडी’ या सर्वच संस्थांमध्ये सहभाग
  • १९६७मध्ये ’अभाविप’च्या विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या युवक काँग्रेसच्या टग्यांविरुद्ध काढलेला मोर्चा.


(अपूर्ण)