"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २७:
==विवाहित स्त्रीचे नाव==
लग्न झाल्यानंतर मुलीचे आडनाव बदलते आणि वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव येते. त्याशिवाय अनेकदा, लग्नसमारंभादरम्यान मुलीचे व्यक्तिनामही बदलून दुसरे ठेवले जाते. असे झाले तर स्त्रीच्या नावामधील प्रत्येक घटकात बदल होऊन तिला संपूर्णपणे वेगळेच नाव मिळते. या नव्या नावात तिच्या लग्नापूर्वीच्या नावातला कोणताही अंश शिल्लक नसतो.
 
==नाव लिहिण्याच्या विविध पद्धती==
 
==नुसतेच व्यक्तिनाव==
 
नाट्यचित्रपट सृष्टीतले कलावंत अनेकदा फक्त व्यक्तिनावाचेच ओळखले जातात. अभिनेत्री गौरी, सीमा, सुलोचना ही त्यांतली काही उदाहरणे. अभिनेते धुमाळ, वाटवे हे फक्त आडनावाचे ओळखले जात. यशवंत यांच्यासारखे काही कवीही फक्त व्यक्तिनावाने प्रसिद्ध आहेत. (कवी) कालिदास, (गणिती) भास्कराचार्य, बाजीप्रभू, महादू, म्हादू, रघू (कऱ्हाडकर) ही आणखी काही उदाहरणे. काही वर्षांपूर्वी ईव्ह्‌ज वीकली या स्त्रियांच्या नियतकालिकाने स्त्रियांना त्यांचे व्यक्तिमत्त्व असावे, त्यासाठी त्यांनी आपल्या नावानंतर वडिलांचे नाव, पतीचे नाव वा आडनाव लिहू नये असा खूप प्रचार केला होता. त्याला त्याकाळी काही बायका बळी पडल्या होत्या. पण त्या पद्धतीतला फोलपणा दिसून आल्यामुळेच बहुधा ती पद्धत निदान महाराष्ट्रात तरी चालली नाही. दक्षिणी भारतीयांना आडनाव नसते, त्यामुळे नावांवरून त्यांची जात ओळखता येत नाही, म्हणून ती आदर्श पद्धत आहे, असे काहीजण समजतात. आडनावावरून जात किंवा गाव समजू नये म्हणून काहीजण आपले जुन्या काळापासून चालत आलेले आडनाव बदलतात.
 
==ऐतिहासिक कवींची काही खास नावे==
 
[[रामदास]] हे काही दाशरथी रामाचे भक्त नव्हते, मारुतीचे होते. त्यांनी ’रामदास’ हे मारुतीसाठी वापरले जाणारे विशेषण स्वतःचे नाव म्हणून घेतले. तुकारामांनी आपल्या अभंगांत गोवण्यासाठी ’तुका’ वापरले,तर नामदेवाने ’नामा’. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पद्यरचनेत गोवण्यासाठी ’बापरखुमादेवीवरू’ हे, तर एकनाथांनी त्यांच्या गुरूची आठवण म्हणून ’एकाजनार्दन’ हे नाव घेतले.
 
==टोपण नाव==
Line ४६ ⟶ ४८:
हीही एक इतिहासकालीन पद्धत असून ती मराठी समाजात अजूनही प्रचलित आहे. तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, राजा गोसावी, राजा परांजपे, माधव वझे, शांता शेळके, हरी नरके, लता मंगेशकर, दुर्गा भागवत वगैरे अनेक जणांचे नाव या पद्धतीचे आहे.
 
==दुहेरीआदरार्थी प्रत्ययांकित नावे==
 
काही लोकांच्या नावाला जोडलेला ’जी’, ’राव’, महाराज सारखायांसारखा आदरार्थी प्रत्यय त्यांच्या नावात इतका मिसळून गेलेला असतो की, त्या प्रत्ययाशिवाय उच्चारलेले नाव त्या व्यक्तीचे वाटतच नाही. <br />
अशी काही नावे : शिवाजी(महाराज), शिवाजीराव (पटवर्धन, भोसले), नानाजी (देशमुख), बाजीराव, रावबाजी
अशी काही नावे : शिवाजी-येसाजी-बहिर्जी-तानाजी-मालोजी, शिवाजीराव (पटवर्धन, भोसले), नानाजी (देशमुख), (केशव) भिकाजी (ढवळे), महादजी (शिंदे), रावबाजी, बाजीराव (पेशवे), मल्हारराव (होळकर), जयंतराव (टिळक), श्यामराव (ओक), हिराबाई (बडोदेकर), गायत्रीदेवी (मानसिंग), नानासाहेब (पेशवे, परुळेकर), भिकुसा (यमासा क्षत्रिय), महादेवशास्त्री (जोशी), दाजीशास्त्री (पदे), जोतिबा (फुले), राघोबा, ज्ञानबा-तुकोबा, गोरोबा (कुंभार), म्हादबा, बाबामहाराज (सातारकर), वगैरे. संस्थाने संपून काळ लोटला तरी संस्थानिकांचे वंशज स्त्रीपुरुष अजून ’राजे’ लावतात. उदा० वसुंधराराजे सिंदिया, रामराजे निंबाळकर वगैरे.
 
==दुहेरी आडनावे==
 
काही विवाहित स्त्रियांच्या नाव’नाव आणि आडनाव अशा पद्धतीने लिहिलेल्या नावांत आधी माहेरचे आडनाव आणि नंतर सासरचे आडनाव लिहिलेले आढळते. उदा० लीला मस्तकार रेळे, अलका कुबल आठल्ये, भक्ती बर्वे इनामदार, सई परांजपे जोगळेकर, वैष्णवी कानविंदे पिंगे, वगैरे. कधी काळी व्यवसायाने पाटील वा कुलकर्णी असणाऱ्या व्यक्ती आपल्या नावात दोन आडनावांचा समावेश करतात. विखे पाटील, बुट्टे पाटील, रेडे कुलकर्णी, [[(नारायण) कुलकर्णी कवठेकर]] आदी. विनोदी मराठी लेखक वि.मा. दी.पटवर्धन यांच्या नावातला ’दी’ म्हणजे दीक्षित. महाराष्ट्रातील काही कुटुंबांची आडनावे मुळातच दुहेरी असतात. कदमबांडे, जोशीराव, ठाकुरदेसाई, नाईकनवरे, , नाईक निंबाळकर, नाईक साटम, पंतवैद्य, पाठकपुजारी, पैधुंगट, प्रभुचिमुलकर, प्रभुदेसाई, मानेशिंदे, मानेशिर्के, रावकवी, रावजोशी, रावराणे, रावराजे, राजेशिर्के ही तसली काही उदाहरणे. सेनगुप्ता, दासगुप्ता, रायचौधरी, रायभौमिक, रायसेन ही बंगाली जोड‌आडनावे प्रसिद्धच आहेत. काही बंगाली आडनावे तिहेरी असतात. उदा० बसू राय चौधरी, घोष रॉय चौधरी वगैरे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक [[गुरू दत्त]]ची पत्नी असलेली प्रसिद्ध गायिका [[गीता दत्त]], हिचे माहेरचे आडनाव घोष रॉय चौधरी होते, सासरचे खरे तर पदुकोण, पण ती दत्त लावीत असे..
 
==बदललेली आडनावे==
Line ८८ ⟶ ९१:
* व्यक्तिनाव आणि मग मालकाचे नाव : उदा० जनी नामयाची
* वडिलांचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव : उदा० शाहसूनो: शिव(स्य मुद्रा भद्राय राजते)
* स्वतःचे नाव आणि गुरूचे नाव : एकाजनार्नन
 
==नावाऐवजी उपाधी==