"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
;महाराष्ट्रीय किंवा मराठीभाषक असणाऱ्या व्यक्तीच्या नावांचे प्रकार आणि नाव लिहिण्याच्या पद्धती :
 
==जन्मनाव==
 
मूल जन्माला येते तेव्हा त्याला किंवा तिला देण्यात येणारे तात्पुरते नाव म्हणजे जन्म नाव. ज्या प्रसूतिगृहात आईची प्रसूती होते होते तिथे हे नाव त्यांच्या नोंदणी वहीत नोंदण्यासाठीच्या उपयोगाचे असते.
ओळ १२:
 
हिंदू समाजात बालकाच्या जन्मानंतरच्या बाराव्या दिवशी मुलाचे नामकरण किंवा बारसे करण्याची पद्धत आहे. त्या दिवशी शक्य नसले तर हे बारसे नंतरही केले जाते. त्यादिवशी ठेवल्या जाणाऱ्या नावाला ‘पाळण्यातले नाव’ असे म्हणतात. कधीकधी एकाऐवजी ‘हे’ ऊर्फ ‘ते’ असे जोडनावही ठेवले जाते. कारवार-मंगलोरकडे अशा वेळी पाच नावे ठेवण्याची पद्धत आहे.
 
ख्रिचनधर्मीय बालकांचे पाळण्यातले नाव कधीकधी दुहेरे किंवा तिहेरी जोडनाव असते. उदा० थॉमस अल्व्हा (एडिसन), रॉबर्ट लुई बॅलफोअर (स्टीव्हन्सन), जॉर्ज बर्नार्ड शॉ, फर्दिनांद व्हिक्टर यूजीन (डेलाक्रॉइक्स) वगैरे. यांतले कंसात दिले आहे ते आडनाव आणि बाकीच्या त्या व्यक्तीचीच नावे. या नावप्रकारात क्रमाने दुसरे येणारे नाव हे ’मधले नाव’ समजले जाते. दक्षिणी भारतातही अशी पद्धत आहे. उदा० दासिग वेंकट सच्च सांब शिवर. यांतले हे दासिग ही गावाचे नाव किंवा आडनाव आणि बाकीचे त्या व्यक्तीच्या नावाचे तुकडे. लिहिताना हे नाव D.V.S.S. Shivar असे लिहिले जाते.
 
उत्तरी भारतीयांत पाळण्यातल्या नावाचे दोन किंवा तीन तुकडे करून पूर्ण नाव बनते. उदा० हरि वंश राय बच्चन. यांतले बच्चन हे काव्यरचनेसाठी घेतले टोपणनाव आणि हरिवंशराय हे पाळण्यातले नाव. त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव वापरलेलेच नाही. त्यांच्या मुलानेही तेच केले. त्याने अमिताभ बच्चन असे नाव धारण केले. त्यामुळे सून ऐश्वर्या राय बच्चन झाली. लाल बहादुर शास्त्री श्रीवास्तव. यांच्या नावातली शास्त्री ही पदवी, श्रीवास्तव हे आडनाव आणि लाल बहादुर हे व्यक्तिनाव. लालबहादुर शास्त्री यांची मुले आता ’शास्त्री’ हेच आडनाव लावतात. जगदीशचंद्र बोस हे नाव J.C. Bose असे, तर श्रीधरलाल हे नाव S,D. Lal असे लिहितात.
 
==व्यवहारातले नाव==