"वासुदेव सीताराम बेंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
६. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र लिहून वा.सी. बेंद्रे थांबले नाहीत तर, त्याच बरोबर बरेच संशोधन करून त्यांनी इतरही पुस्तके लिहिली. उदा० शहाजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे वडील), मालोजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे आजोबा), संभाजी भोसले (शिवाजी महाराजांचे वडील बंधू ), राजाराम, आदिलशहा, कुतुबशहा आणि राजा जयसिंग. बेंद्रे यांनी या व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून मराठेशाही रुजवण्यास कोणत्या घटना व प्रसंग कारणीभूत ठरले हे शोधून काढले. फार थोड्या व्यक्तींनी या पर्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 
७. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाचे अस्सल उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेले 'शिव-चरित्र' (शिवाजीचे चरित्र). हे लिहिण्यापूर्वी बेंद्रे यांनी दोन वर्षे इंग्लंडमध्ये व युरोपात वास्तव्य करून ब्रिटिश म्युझियम तसेच युरोपातील विविध म्युझियममधील कागदपत्रांचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी या ठिकाणाहून गोळा केलेली अनेक महत्वाची कागदपत्रे जहाजाने भारतात आणली. यामुळे जो कालखंड दुर्लक्षित राहिला होता त्यावर प्रकाश पडला. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक सत्ये समोर येऊ शकली, त्यापैकी एक म्हणजे शिवाजी महाराजांची तलवार. ही तलवार 'जगदंब’ म्हणून ओळखली जात होती, 'भवानी तलवार ' म्हणून नव्हे हे बेंद्रे यांनी निर्विवाद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
८. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे असे जनमानसावर अधिराज्य असणारे व्यक्तिमत्त्व. त्याचमुळे महाराष्ट्रसरकारने अनेक विद्वानांना शिवाजीचे चरित्र लिहिण्याचे आवाहन केले. त्यासाठी अनेक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले आणि भरपूर मानधनाचीही तयारी दाखवली, परंतु लिखाणाचे हे शिव धनुष्य पेलण्यासाठी कोणीही पुढे येईना. फक्त वा. सी. बेंद्रे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या हे आव्हानात्मक काम स्वीकारले. हे लिखाण म्हणजे त्यांच्या समर्पण वृत्तीचे आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेचे फळच आहे.
 
९. वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत किचकट असे चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा दप्तराच्या दस्तऐवजाचे वर्गीकरण व जुळणी करण्याचे, तसेच कॅटलॉगिंगचे काम चिकाटीने अल्पावधीत पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्यावर तंजावर दप्तराचे कॅटलॉगिंग करण्याची जबाबदारी, मद्रास राज्याचे तत्कालीन मुखमंत्री राजगोपालाचारी यांनी दिली. जे काम पूर्ण होण्यास पाच वर्ष कालावधीची अपेक्षा सरकारने केली होती, ते काम वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत चिकाटीने अवघ्या दोन वर्षात पूर्ण केले. त्यांचे हे कार्य केवळ त्यांच्या अफाट कार्यक्षमतेची, जिद्दीची आणि परिश्रमाची परिणती आहे.
 
१०. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी 'राजाराम महाराज चरित्र'हा ग्रंथ लिहिला.
 
==वा.सी. बेंद्रे यांनी लिहिलेली पुस्तके==
वा.सी. बेंद्रे यांनी आपल्या नव्वद वर्षांच्या आयुष्यात ५७ हून अधिक इतिहास ग्रंथ लिहिले. त्यांची काही पुस्तके :-
* छत्रपती संभाजी महाराज (पृष्ठसंख्या २००, पुन:प्रकाशन, पहिली आवृत्ती १९६०, नवी एप्रिल २०१३. पार्श्व पब्लिकेशन,कोल्हापूर).
* छत्रपती शिवाजी महाराज' (पूर्वार्ध व उत्तरार्ध) (पृष्ठसंख्या १२००, पुन:प्रकाशन, एप्रिल २०१३. पार्श्व पब्लिकेशन (कोल्हापूर)
* मालोजीराजे आणि शहाजी महाराज (पृष्ठसंख्या ५५०, पुन:प्रकाशन, एप्रिल २०१३. पार्श्व पब्लिकेशन (कोल्हापूर)
* राजाराम महाराज चरित्र
* शिवराज्याभिषेक प्रयोग (पृष्ठसंख्या २००, पुन:प्रकाशन, एप्रिल २०१३. पार्श्व पब्लिकेशन (कोल्हापूर)
* साधन-चिकित्सा
 
==स्मारके, पुरस्कार==
Line २६ ⟶ ३७:
* इतिहास विषयावरील उत्कृष्ट प्रबंध लिहिणाऱ्या एका विद्यार्थ्याला, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाकडून दरवर्षी बेंद्रे यांच्या नावाची शिष्यवृत्ती दिली जाते.
* कोल्हापूरच्या पार्श्व पब्लिकेशन्स या संस्थेने वा.सी. बेंद्रे यांनी लिहिलेल्या काही इतिहासविषयक ग्रंथांचे समारंभपूर्वक पुन:प्रकाशन केले आहे. (पुणे, ६ एप्रिल २०१३)
 
==व्यक्तिगत माहिती==
बा.सी. बेंद्रे यांच्या कन्या साधना बेंद्रे-डहाणूकर या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत.
 
[[वर्ग:इतिहासकार]]