"विष्णु मोरेश्वर महाजनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रावबहादुर ''' विष्णु मोरेश्वर महाजनी''' (जन्म: पुणे, [[१२ नोव्हेंबर]] [[इ.स. १८५१]]; मृत्यू : अकोला, [[१६ फेब्रुवारी]] [[इ.स. १९२३]] ) हे मराठीतील समीक्षक, कवी व नाटककार होते. त्यांनी काव्ये, नाटके, कादंबऱ्या, चरित्रे, प्रवासवर्णने इत्यादी वाङ्‌मय प्रकारांबरोबर अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण, शिक्षणशास्त्र अशा विषयांवरीलही मार्मिक समीक्षणे लिहिली आहेत. महाजनी यांनी पात्रांवर मराठी परिवार चढवून [[शेक्सपियर]]च्या तीन नाटकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.
 
महाजनी यांचे शालेय शिक्षण धुळ्यात व उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. ते इ.स. १८७३साली एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. वर्ड्‌स्वर्थ, ऑक्झनहॅम, कीलहॉर्न, केरूनाना छत्रे, चिंतामणशास्त्री थत्ते या प्राध्यापकांचा आणि अनंतशास्त्री पेंढारकर यांसारख्या विद्वानाचा, महाजनींच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा होता.
ओळ ६:
 
मे [[इ.स. १९०७]] साली [[पुणे]] येथे झालेल्या पाचव्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. जळगांव येथे १९०७ साली कर्नल कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कविसंमेलन भरले होते. त्या संमेलनात महाजनी यांनी ’कवी आणि काव्य’ या विषयावर दिलेले व्याख्यान फार गाजले होते.
 
विष्णु मोरेश्वर महाजनी हे प्रार्थनासमाजिस्ट नव्हते. पण लोकमान्य टिळकांच्या 'गीतारहस्या' ची मुक्त कंठाने प्रशंसा करणाऱ्या महाजनींनी टिळकांचे व वेदांती मंडळींचे मोक्ष हे ध्येय अमान्य केले होते.
 
==विष्णु मोरेश्वर महाजनी यांचे साहित्य==
Line १२ ⟶ १४:
* डेक्कन कॉलेजच्या आठवणी : ’डेक्कन कॉलेज’ या शीर्षकाखाली महाजनी यांनी त्या कॉलेज जीवनातील गमतीदार अनुभव लिहिले आहेत. [[महादेव गोविंद रानडे]], का.त्रिं तेलंग, वि.ज. कीर्तने यांच्याबद्दलच्या आठवणी पुस्तकांत आहेत.
* तारा (नाटक - [[शेक्सपियर|शेक्सपियरच्या]] ’सिंबेलाईन’ या नाटकाचे नराठी भाषांतर -१८८८)
* बंगाल्यातील जमीनदारीची वहिवाट (१८८६). ह्या ग्रंथासाठी महाजनी यांनी रा.ब.[[महादेव गोविंद रानडे(?)]] यांच्याकडून स्फूर्ती घेतली होती.
* मोहविलसित (नाटक - [[शेक्सपियर|शेक्सपियरच्या]] ’द विंटर्स टेल’चे मराठी भाषांतर -१८८१-८२)
* रामायणकालीन लोकस्थिती निबंध (१९००)