"वासुदेव सीताराम बेंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १:
{{बदल}}
 
वा.सी. बेंद्रे (पूर्ण नाव वासुदेव सीताराम बेंद्रे) (मृत्यूजन्म : १९८६पूर्वीपेण,रायगड जिल्हा-महाराष्ट्र, १३ फेब्रुवारी १८९६; मृत्यू १६ जुलै १९८६) हे महाराष्ट्रातील एक इतिहासकार होते. शिवाजीची आज सर्वमान्य असलेली जन्मतिथी-फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, (१९ फेब्रुवारी, सन १६३०)- ही नक्की करण्याचे अभूतपूर्व काम वा.सी. बेंद्रे यांनी केले. त्यापूर्वीच्या असंख्य इतिहासकारांनी दिलेली तिथी-इ.स. १६२७, शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख शुक्ल तृतीया- ही आता महाराष्ट्रात तरी ग्राह्य धरली जात नाही.
 
१. त्यांचे दुसरे महनीय कार्य म्हणजे, १९३३ साली त्यांनी शोधलेले आणि प्रसिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र होय . १९३३ सालापर्यंत एका मुस्लिम सरदाराचे चित्र हे शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून प्रचलित होते. हा केवळ छत्रपती शिवाजीमहाराजांवरील अन्याय नव्हता तर संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासावर अन्याय होता. इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधलेले हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेन्टाइन यांच्या सांगण्यावरून काढलेले चित्र होते. या चित्रामध्ये त्याने अत्यंत उत्कृष्टपणे शिवाजीमहाराजांचा पेहराव दाखविला असून, तो पूर्वी प्रचलित असलेल्या चित्रातील मुस्लिम सरदाराच्या पेहरावाहून भिन्न आहे.
ओळ १९:
८. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे असे जनमानसावर अधिराज्य असणारे व्यक्तिमत्त्व. त्याचमुळे महाराष्ट्रसरकारने अनेक विद्वानांना शिवाजीचे चरित्र लिहिण्याचे आवाहन केले. त्यासाठी अनेक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले आणि भरपूर मानधनाचीही तयारी दाखवली, परंतु लिखाणाचे हे शिव धनुष्य पेलण्यासाठी कोणीही पुढे येईना. फक्त वा. सी. बेंद्रे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या हे आव्हानात्मक काम स्वीकारले. हे लिखाण म्हणजे त्यांच्या समर्पण वृत्तीचे आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेचे फळच आहे.
 
९. वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत किचकट असे चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा दप्तराच्या दस्तऐवजाचे वर्गीकरण व जुळणी करण्याचे, तसेच कॅटलॉगिंगचे काम चिकाटीने अल्पावधीत पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्यावर तंजावर दप्तराचे कॅटलॉगिंग करण्याची जबाबदारी, गव्हर्नरमद्रास राज्याचे तत्कालीन मुखमंत्री राजगोपालाचारी यांनी दिली. जे काम पूर्ण होण्यास पाच वर्ष कालावधीची अपेक्षा सरकारने केली होती, ते काम वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत चिकाटीने अवघ्या दोन वर्षात पूर्ण केले. त्यांचे हे कार्य केवळ त्यांच्या अफाट कार्यक्षमतेची, जिद्दीची आणि परिश्रमाची परिणती आहे.
 
==स्मारके, पुरस्कार==
* पुणे शहरात, जिथे बेंद्रे यांचे वास्तव्य होते त्या घराला महापालिकेने ऐतिहासिक वारसा ठिकाण म्हणून जाहीर केले आहे.
* मुंबईतल्या चेंबूर उपनगरात जिथे वा.सी. बेंद्रे रहात, तिथल्या एका चौकाला बेंद्रे यांचे नाव देण्यात आले आहे.
* इतिहास विषयावरील उत्कृष्ट प्रबंध लिहिणाऱ्या एका विद्यार्थ्याला, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाकडून दरवर्षी बेंद्रे यांच्या नावाची शिष्यवृत्ती दिली जाते.
* कोल्हापूरच्या पार्श्व पब्लिकेशन्स या संस्थेने वा.सी. बेंद्रे यांनी लिहिलेल्या काही इतिहासविषयक ग्रंथांचे समारंभपूर्वक पुन:प्रकाशन केले आहे. (पुणे, ६ एप्रिल २०१३)