"मराठी साहित्य महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३७:
==दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर==
साहित्य क्षेत्रात काम करणारी आणि साहित्य संमेलने भरविणारी ही संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्न नाही.
 
==अनुदान==
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व महामंडळाच्या चार घटक संस्था, तसेच वर नावे दिलेल्या पण संलग्न नसलेल्या दोन संस्था यांना दरवर्षी रु. ५ लाख इतके अनुदान ’महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती महामंडळ’ या सरकारी संस्थेमार्फत देण्यात येते. शिवाय प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुमारे २५ लाख रुपयांचे अनुदान असते. भारताबाहेर भरलेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनांनासुद्धा सरकारी अनुदान मिळाले आहे.
 
===बृहन्‌‌‌‌‍ महाराष्ट्र===
महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर असलेल्या ज्या साहित्य संस्था महाराष्ट्रालगतच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काम करीत होत्या, त्या साहित्य संस्थांनी महामंडळामध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संस्थांच्या इच्छेचा, मूळ चार घटक संस्थांनी गंभीरपणाने विचार केला आणि त्यांना साहित्य महामंडळात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला गेला.. या निर्णयानुसार [[मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश]] ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्यानंतर नजीकच्या काळात [[कर्नाटक राज्य साहित्य परिषद]] आणि [[मध्यप्रदेश साहित्य संघ]] या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या. या तिन्ही संस्था समाविष्ट झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे रूपांतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात झाले. मात्र या संस्थांच्या सभासदांना मताधिकार नाही.
 
==महामंडळाचे अध्यक्ष ==