"षटकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूला फलंदाजाने त...
(काही फरक नाही)

१३:२३, ३० एप्रिल २०१३ ची आवृत्ती

क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूला फलंदाजाने त्याच्या बॅटीने टोलवून सीमापार केले की चौकार, म्हणजे चार धावा होतात. पण ह्याच चेंडूने सीमापार जाताना मधे जमिनीला स्पर्श केला नाहीतर षटकार झाला असे म्हणतात. षटकार मारल्याबद्दल फलंदाजाच्या खात्यात सहा धावा पडतात. षटकार मारणे हे जरा जास्तच कौशल्याचे काम असल्याने क्रिकेटच्या सामन्यात षटकारांची संख्या त्या मानाने कमीच असते. पण त्यांतही एखाद्या फलंदाजाने प्रथमवर्गीय क्रिकेट सामन्यामध्ये एकाच षटकातील सहाही चेंडू सीमापार टोलवून सहा षटकार मारले तर ती घटना फार कौतुकास्पद समजली जाते.

असे एका षटकात सहा षटकार मारणारे फलंदाज
  • वेस्ट इंडीजचे फलंदाज सर गारफील्ड सोबर्स यांनी इंग्लंडमध्ये १९६८ साली नॉटिंगहॅमशायरसाठी काउंटी सामन्यात खेळताना.
  • भारतीय फलंदाज रवी शास्त्री याने रणजी सामन्यात खेळताना.
  • दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्जने एकदिवसीय विश्वकरंडकाच्या सामन्यात खेळताना.
  • भारताच्या युवराज सिंगने ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यात खेळताना.
  • इंग्लंडच्या लँकेशायरचा फलंदाज जॉर्डन क्लार्क याने इंग्लंडमध्ये स्कारबोरौघ येथे यॉर्कशायर संघाविरुद्ध खेळताना (२५ एप्रिल २०१३ रोजी).