"नारायण वामन दिवाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पंडित नारायण वामन दिवाण (जन्म कोल्हापूर १३ डिसेंबर १९२७; मृत्यू प...
(काही फरक नाही)

००:१५, १२ मार्च २०१३ ची आवृत्ती

पंडित नारायण वामन दिवाण (जन्म कोल्हापूर १३ डिसेंबर १९२७; मृत्यू पुणे, ३१ ऑक्टोबर २०१२) हे पुणे शहरातले एक संगीत कलावंत घडवणारे शिक्षक होते. त्यसंनी इ.स. १९४० ते १९५० या काळात पंडित केशवबुवा इंगळे यांच्या गुरुकुलात संगीत शिक्षण घेतले. १९५१मध्ये त्यांनी पुण्यात आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच काळात त्यांना संगीत अलंकार ही पदवी मिळाली. १९५३मध्ये ना.वा. दिवाण यांनी पुण्यातील नारायण पेठेत सरस्वती संगीत अकादमीची स्थापना केली. १९५७मध्ये ते अखिल भारतीय गंधर्व मंडळामध्ये सहभागी झाले, आणि शेवटपर्यंत ते तेथेच काम करीत होते.

१९५७ ते १९७५ या काळात ना.वा. दिवाण यांनी मुलींच्या एस.एस.डी.टी. महाविद्यालयात संगीत शिकवण्याचे काम केले. त्यांना १९६९मध्ये त्यांना संगीत आचार्य हा पुरस्कार देण्यात आला. सरस्वती संगीत विद्यालयाच्या माध्यमातून ना.वा. दिवाण यांनी अनेक कलावंत घडवले. ते आर्य संगीत प्रसारक मंडळाचेही सदस्य होते.

वयाच्या ८५व्या वर्षी त्यांचे पुण्यात देहावसन झाले.