"कायस्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आख्यायिका : जो पूर्वी ब्रह्मदेवाच्या शरीरात राहात होता{कायस्थ) आ...
(काही फरक नाही)

१४:३५, १० मार्च २०१३ ची आवृत्ती

आख्यायिका : जो पूर्वी ब्रह्मदेवाच्या शरीरात राहात होता{कायस्थ) आणि नंतर बाहेर पडून मर्त्य लोकांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवण्याचे काम करू लागला तो चित्रगुप्त हा पहिला कायस्थ.

चित्रगुप्ताच्या पहिल्या पत्नीचे नाव नंदिनी ऐरावती. ही सूर्यदेवतेची नात होती. नंदिनीला चार पुत्र झाले. भानू, मतिमान, चारू आणि सुचारू. या चौघांपासून अनुक्रमे श्रीवास्तव, सक्सेना, माथुर आणि गौड या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.

चित्रगुप्ताची दुसरी पत्नी शोभावती. तिला आठ मुले झाली. करुण, चित्रचारू, भानुप्रकाश, युगंधर, वीर्यवान, जितेंद्रिय, सदानंद आणि विश्वभानू. या आठ पुत्रांपासून अनुक्रमे कर्ण कायस्थ, निगम, भटनागर, अंबष्ठ, आस्थाना, कुलश्रेष्ठ, बाल्मीक या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.

मिथिलानगरीमध्ये वसती करून राहिलेल्या कर्ण कायस्थांची ’कर्ण कायस्थ मैथिलक’ या नावाची नवीन जात निर्माण झाली.

हा कायस्थ समाज उत्तरी भारतातील अतिशय प्रगत समाज समजला जातो.