"शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुखलाल खाबिया, मोहनलाल खाबिया, जुगराज खाबिया यांच्या प्रयत्नांन...
(काही फरक नाही)

१५:२३, १८ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

सुखलाल खाबिया, मोहनलाल खाबिया, जुगराज खाबिया यांच्या प्रयत्नांनी व. रत्नप्रभा खाबिया व श्रीपाल मुठा यांच्या पाठिंब्याने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था दि. २५ डिसेंबर १९९७ रोजी शरद पवार यांचा हस्ते स्थापन झाली. सुरुवातीला केवळ नृत्य, संगीत, नाट्य, चित्रकला, इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडाविषयक उपक्रम करण्याचे प्रतिष्ठानाने ठरवले होते. मात्र नंतर समाजाच्या दृष्टीने गंभीर ठरलेल्या काही सामाजिक प्रश्नांसंबधी जागरुकता निर्माण करण्याच्या संदर्भात संस्थेने काही कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करणे सुरू झाले.

प्रतिष्ठान करीत असलेली कामे

  • एड्स विरोधात जनजागृती
  • क्षयरोग निर्मूलन
  • गुणी आणि गरजू खेळाडूंना प्रोत्साहन
  • राम कदम पुरस्काराचे आयोजन
  • महाराष्टाचा सांस्कृतिक ठेवा जपणे
  • महाराष्टाच्या पारंपरिक संगीतासाठी अद्ययावत संग्रहालय उभारणे

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उपक्रम

  • एड्सग्रस्तांना आर्थिक मदत
  • क्रीडाविषयक आर्थिक मदत
  • भव्य जागर - गोंधळ स्पर्धा
  • विठू माउली माझी - अभंगवाणी
  • संत तुकाराम अभंग व भजन स्पर्धा

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे दिलेल्या कै.राम कदम कलागौरव पुरस्काराचे मानकरी

२००६ -गीतकार जगदीश खेबुडकर २००७ - संगीतकार भास्कर चंदावरकर २००८ - संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स २००९ - गायिका सुलोचना कदम २०१० - गायक चंद्रशेखर गाडगीळ २०११ - संगीतकार अजय-अतुल २०१२ - गायिका उषा मंगेशकर २०१३ - अशोक पत्की