"मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची सं...
(काही फरक नाही)

१६:३१, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे.  कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत.  अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात, नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत.  मराठवाडा साहित्य परिषदेने भरवलेली मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने  : 


  • १ले, २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.
  • २रे, २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री रेखा बैजल या संमेलनाध्यक्षा रहोत्या.
  • ३रे, २५-२६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा होत्या.
  • बीड येथे ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३


पहा : मराठी साहित्य संमेलने