"अण्णासाहेब हरी साळुंखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg|thumb|डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये]]
डॉ. '''आ.ह. साळुंखे''' (आण्णासाहेब हरी साळुंखे) हे [[मराठी|मराठीतले ]] लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि [[संस्कृत]]चे गाढे अभ्यासक आहेत. ते लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे विभागप्रमुख होते.

१९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्यासुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसऱ्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.
 
४ ऑगस्ट २००९ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती. या समितीत डॉ.आ. ह. साळुंखेंखेरीज वि.वि.करमरकर, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शफाअत खान, गिरीश गांधी, डॉ.अरुण टिकेकर, अशोक नायगांवकर, आमदार उल्हास पवार, प्रा.दत्ता भगत हे सदस्य होते. समितीने तयार केलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा २२-१-२०१० रोजी महाराष्ट्र सरकारला सादर केला. संमत झालेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही आ.ह. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
==जीवन==
Line ४३ ⟶ ४७:
* वैदिक धर्मसूत्रे तथा बहुजनोंकी गुलामगिरी (हिंदी)
* शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
* शिवराय : संस्कार आणि शिक्षण
* सर्वोत्तम भूमिपत्र : आक्षेप
* सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध
Line ५८ ⟶ ६३:
* रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान(वाई)चा महर्षी वि.रा. शिंदे पुरस्कार (१०-४-१९९९)
* सांगली जिल्ह्यातील वाळवे गावाचे क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या हस्ते, कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनामध्ये कार्यकर्त्यांच्या पैशातून घेतलेल्या मारुती व्हॅनची भेट (१४-१०-१९९९). (या गाडीने आ. ह. साळुंखे यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने देण्याच्या निमित्ताने २० वर्षांत ४० हजार किलोमीटर प्रवास केला.)
* छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (थोरले) यांच्या त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा नगरपालिकेने दिलेला पुरस्कार (१९-१-२०१०)
 
* मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा 'प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार' (नोव्हेंबर २०११)
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने केज येथे २४ नोव्हेंबर २०१२रोजी झालेल्या पहिल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* १६-१७ फेब्रुवारी २०१३ या काळात पुणे येथे होणाऱ्या ३ऱ्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष.
* १७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुण्यात झालेल्या पहिल्या [[शिवाजी साहित्य संमेलन|छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद.