"सी.डी. देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:C. D. Deshmukh, Asoka Mehta, and William Phillips 1962.jpg|thumb|right|300px|इ.स. १९६२चे एक समूहचित्र: (डावीकडून उजवीकडे) चिंतामण द्वारकानाथ देशमुख, अशोक मेहता, अमेरिकन पत्रकार विल्यम फिलिप्स.]]
'''चिंतामण द्वारकानाथ देशमुख''' ([[जानेवारी १४]], [[इ.स. १८९६]] - [[ऑक्टोबर २]], [[इ.स. १९८२]]) हे [[मराठी]] अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी होते. ते [[भारतीय रिझर्व बँक|भारतीय रिझर्व बँकेचे]] तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. चिंतामणराव स्वातंत्र्यसेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या [[दुर्गाबाई देशमुख]] यांचेया चिंतामणराव देशमुखांच्या पतीपत्‍नी होतेहोत्या.
 
== कारकीर्द ==
ओळ ६:
 
ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.
 
==राम गणेश गडकरी यांची कविता==
 
चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख यांचे अभिनंदन करण्यासाठी गोविंदाग्रजांनी केलेली ही कविता ...या कवितेला २०१२ साली शंभर वर्षे झाली.
 
(श्रीयुत चिंतामणि द्वारकानाथ देशमुख , I.C.S., हे मुंबई विश्वविद्यालयाच्या सन १९१२च्या प्रवेशपरीक्षेंत पहिले आले. त्या प्रसंगावर खालील ' शब्दपुष्पहार ' गुंफिला होता.)
 
'''अभिनंदनपर वर्धमान'''
 
धन्य! धन्य! बा तव सुयशाची होतां जाणीव ,
सहर्ष वर्षत आशीर्वच कवि ' वत्स , चिरंजीव '.
परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें
राग नसावा त्याचा बाळा! क्षमा इथें साजे.
आनंदाचे भरांत नाचे मन्मानस , बाळ!
कशास त्याला उगीच सांगू ' शिष्टनियम पाळ ?'
हर्षदर्शना नियम न कांहीं ; हृदयहि अनिवार ;
गुण आकर्षण ; परिचय केवळ उपचार!
अथवा कविला बंधन कोठें मनिं आणुनि हेंची--
क्षमा करावी , बाळ! माझिया पुरोभागितेची.
विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान
तुझ्या कुळाला , जातीलाही त्याचा अभिमान.
पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला ;
स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला!
स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज , महाभागा!
भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा!
समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती
उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती!
गरीब माझी रसवंती ; परि होतां अतिहृष्ट
शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरुनि , काढि दृष्ट.
ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट ,
सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट.
धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार ,
परी तुझ्याही शिरीं भार नव तसाच देणार.
वंश , जाति तव , समाज , त्यापरि महाराष्ट्रभाषा ,
आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा.
दिव्य अलौकिक जें जें दिधलें ईशें मनुजाला ,
ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला.
ईश्वररूपा जगीं रमे श्री मानवता देवी ,
निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवीं!
गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा ,
वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा.
दंभ , गर्व , अभिमान दडपुनी पायांनीं अरतीं
निजपुण्यबळें असा सारखा जा वरती वरती.
प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई ,
क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही!
' मी , माझें कुळ , माझी जाती , समाज माझा हा
श्री मानवता देवी माझी , ईश्वर मीच अहा! '
अशा भावना मनि ठेवुनियां जा वरती वरती ,
हृदयसागरा सदा येऊं दे अमर्याद भरती!
उंच भराऱ्या गगनीं तुजला पाहुनि घेतांना ,
परस्परांना दावूं इथुनी डोलावून माना.
धन्य धन्य तूं त्रिवार धन्यचि ; धन्य पिता-माता!
हर्षाश्रूंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां!
फुला उमलल्या! वास यशाचा नित्य नवा पसरीं ,
दरवळुनी मोहुनी गुंगवीं ही दुनिया सारी!
' विजयी भव , महदायुष्मान् भव , चढविं यशोनाद! '
खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद!
पाप , अमंगल , अनिष्ट किंवा अभद्र हें कांहीं ,
स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही.
जें जें मंगल , दिव्य तसें जें , पुण्यहि जगतीं ,
दृष्टि तयाची होवो बाळा , सदैव तुजवरती!
नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि ,
करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि!
श्रीपरमात्मन्! मागतसों हें तुजपाशीं एक ,
करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक.
असो ; असों दे ओळख बाळा , लोभहि राहूं दे.
नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे.
बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्या भंवतीं ,
अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं.
किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं ,
असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं.
अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड ,
क्षमा तयाची करिं ; कविता ही अशीच रे द्वाड!
हृदयदर्शना कसाबसा हा शब्दपुष्पहार--
' गोविंदाग्रज ' धाडी प्रेमें , बाळा , स्वीकार.
दिनांक : १९-१२-१९१२
 
== चित्रदालन ==