"नृत्यनाटिका (बॅले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका (इंग्रजीत बॅले) म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात. पण महाराष्ट्रात नृत्यनाटिका सादर करणारे कलावंत तसे कमीच आहेत. उत्तरी भारतात, विशेषत: बंगालचे आणि ओरिसाचे कलावंत या क्षेत्रात अग्रेसर आहेत.
 
==त्यांपैकीमहाराष्ट्रातील काही नृत्यनाटिका==
 
* महामानव डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] : लेखक विजयकुमार गवई. सादरकर्ते : नंदकिशोर कल्चरल सोसायटी{यमुनानगर, निगडी- पुणे). दिग्दर्शक : नंदकिशोर कपोते. इ.स. १९९१पासून या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात.
* नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या [[रुक्मिणी स्वयंवर]] नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता.
* डॉ. मल्लिका साराभाई यांची भगवान बुद्धाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिका -
* हेमा मालिनीची दुर्गा नावाची नृत्यनाटिका
* ५ नोव्हेंबर २०११ रोजी अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील फिनिक्स येथील मेट्रो मराठी मंडळाच्या दिवाळी कार्यक्रमात मुन्शी प्रेमचंद ह्यांच्या ईदगाह या गोष्टीवर आधारित ’जत्रा’ नावाची एक संगीत नृत्यनाटिका 'जत्रा' सादर करण्यात आली होती.
* नृत्यनाटिका अंबा (दोन अंकी)
 
==महाराष्ट्राबाहेरील कलावंत आणि त्यांच्या नृत्यनाटिका==
* सचिन शंकर : आगगाडी (१९७१), पूर्व बंगालचे नावाडी (१९७१), ना (१९७२), भूत (१९७३), क्रिकेट (१९७३) , पालखी (१९७५), प्रतीक्षा (१९७५) , प्रत्येकजण (१९८६) वगैरे.. या सर्व नृत्यनाटिकांना सलील चौधरींचे संगीत होते.
* उदय शंकर
* चित्रगंगा, भूल स्वर्ग - सादरकर्ते :
* अहल्या : सादरकर्ते हैदराबाद येथील अस्मिता ही संस्था
 
 
 
{अपूर्ण)