"कोथिंबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १:
[[चित्र:Coriandrum_sativum_-_Köhler–s_Medizinal-Pflanzen-193.jpg|250px|right|thumb|कोथिंबीरीचे झाडाचे अवयव व फळे]]
'''कोथिंबीर''' (इंग्रजी नाव Coriander, हिंदी नाव: धनिया), शास्त्रीय नाव: कोरिअँड्रम सॅटिव्हम. जीही [[अन्न|अन्नाचा]] स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा शिजवून खाल्ली जाते, अशा एका प्रकारची ही [[वनस्पती]] आहे. उदाहरणार्थ, [[मिसळ पाव]] अथवा [[पोहे]] यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते. फोडणी करताना उकळत्या तेलात कोथिंबीर टाकतात. क्वचित कोथिंबिरीची शिजवून भाजीही केली जाते. [[कोथिंबीर वडी|कोथिंबिरीच्या वड्या]] करताना कोथिंबीर वाफवून घ्यावी लागते.
 
[[विदर्भ | विदर्भात ]] कोथिंबीरीला '''सांबार''' असे म्हणतात.
[[विदर्भ | विदर्भात ]] कोथिंबिरीला '''सांबार''' असे म्हणतात. (गुजराथमध्ये जेवताना पानात चिरून वाढलेल्या कांदा, गाज, हिरवी पपयी आदींना सांबारो म्हणतात. दक्षिणी भारतातल्या आमटीच्या सांबार म्हणतात.)
== वनस्पती ==
* ही [[वनस्पती]] [[वर्षायू]] (जीवनकाल - एक वर्ष) असते.
* पाने दोन प्रकारची असतात. खालची पाने लांब देठाची, [[विषमदली]] व अपूर्ण पिच्छाकृती (पिसासारखी) असून त्यांचे तळ खोडाला वेढणारे असते, तर वरची पाने आखूड देठाची, अपूर्ण पिच्छाकृती व खंडित असतात. खोड पोकळ असते.
* फुले लहान, पांढरी किंवा गुलाबी-जांभळी असून संयुक्त [[चामरकल्प]] (छत्रीसारख्या) फुलोऱ्यात येतात.
* फळे पिवळट, गोलाकार व शिरा असलेली असून ती दोन सारख्या भागांत विभागतात. प्रत्येक भागात एकेक बी असते. फळाला धणा म्हणतात.
 
== उपयोग ==
* कोथिंबिरीची पाने चवीला किंचित तिखट व स्तंभक असून [[उचकी]], दाह, [[कावीळ]] इत्यादींवर गुणकारी असतात, असा [[आयुर्वेद|आयुर्वेदात]] उल्लेख आढळतो.
* फळे मूत्रल, वायुनाशी, उत्तेजक, पौष्टिक व दीपक (भूक वाढवणारे) आहेत. शूल(पोटातील वेदना) व रक्ती [[मूळव्याधमुळव्याध]] यांवर धण्यांचा काढा देतात.
* अधिहर्षतेमुळे ([[अ‍ॅलर्जी]]मुळे) होणाऱ्या दाहावर पानांचा रस आणि लेप गुणकारी असतो.
* या वनस्पतीमध्ये असलेल्या सुगंधी [[उडनशील]] तेलांमुळे, या वनस्पतीला सुगंध असतो. हिची वाळलेली फळे म्हणजे [[धणे]] मसाल्यांत वापरतात. घटक - यात [[लोह|लोहाचे]] प्रमाण जास्त असते.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथिंबीर" पासून हुडकले