"कोजागरी पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[आश्विन पौर्णिमा]] ही '''कोजागरी पौर्णिमा''' किंवा '''शरद पौर्णिमा''' म्हणून साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे '''कोजागरी पौर्णिमा''' बहुधा ऑक्टोबरमध्ये असते.
 
या दिवशी [[दूध]] आटवून केशर, पिस्ता, बदाम वगैरे सुकामेवा घालून [[लक्ष्मीदेवी|लक्ष्मीदेवीला]] नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन ([[संस्कृत|संस्कृतमध्ये]]) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.
 
'''कोजागरी पौर्णिमा''' [[गुजरात]]मध्ये [[रास]] व [[गरबा]] खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते. [[बंगाली लोक]] याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. [[मिथिला|मिथिलेमध्ये]] या रात्री कोजागरहा पूजा केली जाते.
 
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात.
 
आश्विन महिन्यात जर दोन पोर्णिमा आल्या त्यर पहिल्या दिवसाच्या पौर्णिमेला '''कोजागरी पौर्णिमा''' म्हणतात, तर दुसर्‍या दिवशी येणारीला आश्विन पौर्णिमा किंवा [[नवान्न पौर्णिमा]] म्हणतात.
 
मराठीत बोलताना, कोजागरी हा शब्द अनेकदा कोजागिरी असा उच्चारला जातो.