"कोजागरी पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[आश्विन पौर्णिमा]] ही '''कोजागरी पौर्णिमा''' किंवा '''शरद पौर्णिमा''' म्हणून साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते.
 
या दिवशी [[दूध]] आटवून केशर, पिस्ता, बदाम वगैरे सुकामेवा घालून [[लक्ष्मीदेवी|लक्ष्मीदेवीला]] नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन ([[संस्कृत|संस्कृतमध्ये]]) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.