"सदाशिव रामचंद्र गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्राचार्य डॉ. सदाशिव रामचंद्र ऊर्फ '''स.रा. गाडगीळ''' (''जन्म'' - [[इ.स. १९१६]] कुरुंदवाड ''मृत्यू'' - [[इ.स.२ ओक्टोबर २००८]] [[पुणेमुंबई]]) हे [[मराठी]]तील समीक्षक तसेच भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक होते. स्त्रीप्रधान समाजव्यवस्था, [[बौद्ध]]धर्म, [[मानववंशशास्त्र]] आणि भारतीय साहित्यशास्त्र हे गाडगीळांचे चिंतनाचे विषय होते. [[महात्मा बसवेश्वर]] यांच्याविषयी मूलगामी चिंतन करून लिंगायत धर्माची भूमिका गाडगीळांनी परखडपणे मांडली. 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाचेही ते काही काळ संपादक होते.
 
==जीवन==
ओळ ६:
==लेखन==
*'वैदिक यज्ञ-मध्ययुगीन तंत्रसाधना आणि [[ज्ञानेश्वर]]प्रणीत भक्तियोग' - गाडगीळांनी पदवीसाठी लिहिलेला प्रबंध.
*'शोकात्म विश्वरूपदर्शन' (राजहंस प्रकाशन -महाराष्ट्र शोकात्मसरकारचा १९९९-२०००चा पुरस्कार) - विश्वरूपदर्शन, शोकात्म साहित्याच्या नाट्याचे अंतरंग, कॅथॉर्सिस आणि शोकात्मतेचा भावनात्मक परिणाम, शोकात्म नाट्याचा नायक, [[ग्रीक]] शोकात्म नाट्य, ग्रीक शोकात्म नाट्यातील कलात्म सौंदर्य आणि वैचारिक मौलिकता, [[शेक्सपियर|शेक्सपियरियन]] शोकात्मिका, [[इब्सेन]]युग, [[महाभारत]], शोकात्म विश्वरूपदर्शन अशा पद्धतीचे शोकात्मिकेचे संपूर्ण सर्वांगीण विवेचन स.रा. गाडगीळांनी या ग्रंथात मांडलेले आहे.
*'काव्यशास्त्रप्रदीप' (व्हीनस प्रकाशन) - भरतमुनीची रसचर्चा आणि नाट्यशास्त्राची मांडणी यावर आधारित ग्रंथ. भारतीय व पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा एकत्र परिचय करून देणारे डॉ. स. रा. गाडगीळ यांचे साहित्य विचार. (नरहर कुरुंदकरांची प्रस्तावना )
*'लोकायत' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन) - देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या लोकायत ग्रंथावर आधारित.
* मराठी काव्याचे मानदंड
* हॅम्लेट: एक चिकित्सक अभ्यास ( वि. स. खांडेकरांची प्रस्तावना)
* प्राचीन भारतीय धर्मविचार आणि मराठी संत (प्रा. गं. बा. सरदार यांची प्रस्तावना)
* 'सवाई माधवराव यांचा मृत्यू: एक चिकित्सक अभ्यास'
* 'सभासद बखरी'चे संपादन
* 'मराठी काव्यांगणातील इंदधनु' हे इंदिरा संतांच्या काव्याचे सौंदर्य कथन करणारा ग्रंथ
* साहित्यमीमांसा आणि समाजदर्शन (पद्मगंधा प्रकाशन)
* मराठी काव्याचे मानदंड खंड एक आणि दोन( पद्मगंधा प्रकाशन)
* विचारमंथन (प्रतिमा प्रकाशन }
 
 
==[[मराठी रंगभूमी]]साठीचे कार्य==
[[इ.स. १९९३]] साली शासकीय संगीत नाट्यस्पर्धा झाली त्यात स.रा. गाडगीळांनी दिग्दर्शन केलेल्या [[कट्यार काळजात घुसली]] या नाटकास आठ पुरस्कार मिळाले होते.<br />
ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक होते. त्यांनी बसविलेल्या 'संगीत मानापमान', 'कट्यार काळजात घुसली', दत्ता भगत लिखित 'अश्मकने इतिहास घडविला होता', या नाटकांनी दिल्लीपर्यंत जाऊन अनेक पारितोषिके प्राप्त केली होती.
 
 
 
==पुरस्कार==
* ’कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी महाराष्ट्र सरकारचे ८ पुरस्कार (१९९३)
* उत्कृष्ट वाङ्‌मयमूल्य असलेल्या ग्रंथास, दरवर्षी [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] '''स.रा.गाडगीळ''' पुरस्कृत विजया गाडगीळ स्मृती पुरस्कार देते.
* ’शोकात्म विश्वरूप दर्शन’ या '''स.रा. गाडगीळ'''लिखित [[राजहंस प्रकाशन|राजहंस प्रकाशित]] पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९९-२०००चा उत्कृष्ट ग्रंथासाठीचा पुरस्कार
* [[महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ]]ाची [[जीवन गौरववृत्ती]] २००८-२००९
 
 
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]