"महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''महाराष्ट्र भाषा सभा''' या पुण्यातील संस्थेची स्थापना [[न.चिं. गाडग...
(काही फरक नाही)

१९:५८, २१ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्र भाषा सभा या पुण्यातील संस्थेची स्थापना न.चिं. गाडगीळ, मामा देवगिरीकर आदी नेत्यांनी, स्वतंत्रपणे हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी १९४५ साली केली.

महाराष्ट्र भाषा सभा' ही भारतातील प्रमुख स्वयंसेवी हिंदी प्रचार संस्थांमध्ये अग्रगण्य आहे. संस्थेची स्वत:ची इमारत, छापखाना, ग्रंथालय आणि अध्यापन मंदिर आहे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे प्रबोध, प्रवीण, पंडित आणि प्राज्ञ या हिंदीच्या परीक्षा घेतल्या जातात. या अनुक्रमे एस्‌एस्‌सी, बारावी, बी.ए. आणि एम.ए. या परीक्षांच्या दर्जाच्या समजल्या जातात.

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांतली मुख्य पुस्तके हिंदी पुस्तकांचे मराठी आणि मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद आहेत. सभेने प्रकाशित केलेल प्रमुख ग्रंथ :

  • कवीन्द्र चन्द्रिका
  • जगनामा
  • पर्वताख्यान
  • फूलबन
  • बृहद् हिन्दी मराठी शब्दकोश

मासिक पत्रिका

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे प्रकाशित पत्रिका : राष्ट्रवाणी (मासिक ), संपादक : प्रा.सु.मो.शाह.

पत्ता

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे, ३८७, नारायण पेठ, पुणे-४११०३० (महाराष्ट्र )