"सु.मो. शाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्राध्यापक '''सु.मो.शाह''' (जन्म:) हे हिंदी विषयाचे लेख, संपादक आणि शिक...
(काही फरक नाही)

१८:१५, २१ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

प्राध्यापक सु.मो.शाह (जन्म:) हे हिंदी विषयाचे लेख, संपादक आणि शिक्षक आहेत. पुण्यातील गरवारे महाविद्यालयाचे (एम.ई.एस. कॉलेजचे) उपप्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले आहेत. सु.मो. शाह हे नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे क्षेत्रीय निर्देशक आणि अखिल भारतीय हिंदी संस्था संघाचे कोषाध्यक्ष होते. सु.मो शाह हे भारतातील ईशान्येकडच्या राज्यांत हिंदीचा प्रसार व्हावा यासाठी वर्धा (महाराष्ट्र) येथे स्थापन झालेल्या राष्ट्रभाषा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा (पुणे) या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या ’राष्ट्रवाणी’ या साहित्यिक व समीक्षात्मक मासिक हिंदी पत्रिकेचे संपादक आहेत.

प्रथितयश हिंदी कवी महेंद्रभटनागर यांच्यावर ’राष्ट्रवाणी’ने २०१० साली सु.मो. शाह यांनी संपादित केलेला जवळजवळ शंभर पृष्ठांचा एक विशेषांक प्रकाशित केला होता.

पुण्यात २०११ साली झालेल्या ’हिंदी आंदोलन’ च्या वार्षिक समारंभात सु.मो. शाह यांचा स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि एक रोपटे देऊन सत्कार करण्यात आला होता.


पुरस्कार

प्रा. सु. मो.शाह यांना १४ सप्टेंबर २०१२ रोजी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य ॲकॅडमीतर्फे साने गुरुजी राष्ट्रीय एकता पुरस्कार देण्यात आला. रोख रुपये ५१ हजार व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.