"महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ५७:
 
==गुहा==
अनेक किल्ल्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर गुहा आहेत. लोहगडावर लोमेश ऋषींची एक पुराणकालीन गुहा आहे.
 
==तवा==
देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो.त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागऱ्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.
==खंदक==
किल्ल्याभोवती खोदलेला वर्तुळाकार चर. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नसे. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत. चाकणच्या किल्ल्याभोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंद असा पाण्याने भरलेला खंदक होता.
==कुसू==
किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत. या शब्दाचे अनेकवचन कुसवे असे होते.
==तट==
तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत. किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते. जो भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चढण्यास अशक्य, तेथे तट बांधला जात नाही. कधीकधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला असतो. तुंगी गडाला सर्व बाजूने कडा असल्याने त्याला तटबंदीच नाही. फक्त दरवाजा आणि भोवती बुरूज आहेत.
==स्तंभ आणि दीपमाळा==
रायगडावर एक लोहस्तंभ आहे आणि दोन अनेकमजली जयस्तंभ आहेत. शिवाय अनेक किल्ल्यांवर दीपमाळांचे स्तंभ आहेत
==झरोके==
किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकतो. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते तेथे चिद अधिक तिरके असते.
Line ७१ ⟶ ७४:
या तटावरील छिद्रांनाच जंग्या म्हणतात.
==बुरूज==
==ढालकाठी==
ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर असे. विचित्रगडावरील फत्तेबुरुजावर अशी ढोलकाठी आहे.
 
==देवड्या==
देवड्या म्हणजे बुरुजांवरील पहारेकऱ्यांची जागा.
 
==कडा==
कडा म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणाऱ्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत तासून तासून गुळगुळीत केलेली असते. या कड्याच्या बाजून शत्रूचा हल्ला होण्य़ाची अजिबात शक्यता नसते.
 
==टोक==
गडावरील टोक म्हणजे सपाट भिंतीसारख्या खोल कड्याचा गडावरील सपाट माथा. रायगडावर भवानी टोक आणि टकमक टोक अशी दोन टोके आहेत. टकमक टोकाखाली २८०० फूट खोलीचा सपाट भिंतीसारखा कडा आहे. या टोकापाशी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे टोकावर उभे रहाता येत नाही. कधीकधी वारा खोऱ्यातून वर वर चढत टकमक टोकापर्यंत पोचतो. त्यामुळे खोऱ्यात उडणाऱ्या घारीसुद्धा वर फेकल्या जातात. त्यामुळे टोकावर पालथे झोपून कडा आणि खालचे खोरे न्याहाळावे लागते.
 
==कडेलोटाची जागा==
रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे.
 
==बालेकिल्ला==
बालेकिल्ला (मूळ अरबी शब्द बाला-इ-किला) म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचित एका गडावर दोन बालेकिल्ले असतात. [[राजमाची]] किल्ल्याला दोन उभे सुळके आहेत, म्हणून तिथे दोन बालेकिल्ले आहेत. सुळक्यांमधल्या जागेत तटबंदी आहे. राजगडवरील[[राजगड|राजगडावरील]] बालेकिल्ला चढायला अतिशय कठीण आहे.
 
बालेकिल्ल्यावरील इमारतीत किल्लेदार आणि हवालदार रहात. क्वचित राजमंदिरही असे.
 
==माच्या==
माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या त्या भागाचे संरक्षण करते. [[राजगड|राजगडावर]] संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत. [[प्रचंडगड|प्रचंडगडावर]] बुधला माची आणि झुंझार माची आहेत. [[कोरलई]] किल्ल्यावरच्या माचीचे नाव आहे ‘क्रूसाची बातेरी’. ही माची इ.स.१५५१मध्ये पोर्तुगीज गव्हर्नराने बांधली.
 
==अंबरखाने==
Line ९१ ⟶ १०४:
 
==टांकी, तलाव, विहिरी==
पिण्याच्या पाण्यासाठी गडावर टांकी, विहीर आणि एखादा तलाव असे. टांकी खडकांत खोदलेली असत. पाच मीटर लांब, दोन-चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी टांकी गडाच्या चहूबाजूंना असत. पावसाच्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे ही टांकी भरत. क्वचित दोन टांकी जोडलेली असत. [[सिंहगड|सिंहगडावरचे]] देवटांके त्याच्या चविष्ट, थंडगार व औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. [[रायगड|रायगडावरच्या]] आणि [[लोहगड|लोहगडावरच्या]] टांक्यांमधले पाणीही रुचकर आहे.
 
[[रायगड|रायगडावर]] गंगासागर नावाचा कधीही पाणी न आटणारा तलाव आहे आणि शिवाय, कुशावर्त आणि हत्तीतलाव नावाचे आणखी दोन तलाव आहेत.
 
 
==पेठा (पेठ-कारखाना)==
किल्यासाठी असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला अपवाद म्हणजे रायगड किल्ला. या किल्ल्यावर नामांकित बाजार आहे. मध्ये रुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंनी दगडी बांधणीची मापीव बावीस बावीस दुकाने. इथे प्रत्येक दुकानाला माल साठवण्यासाठी मागे दोन दोन खोल्या आहेत आणि खाली तळघर आहे. या दुकानांतून घोड्यावर बसून, जाता जाता खाली न उतरता माल खरेदी करता येत असे.
 
==धान्यकोठ्या==
==अंधारकोठड्या==
अंधारकोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा. ही खोली पंचवीस फूट खोल असून वरती केवळ एक झरोका असे. शत्रूच्या तापदायक माणसाला पकडून आणल्यावर वरून दोराने खाली सोडून दिले जाई. अन्नपाणीही असेच दोराने पुरवले जाई.
==थट्टी (पागा)==
==पीलखाना==
Line १०९ ⟶ १२५:
==नगारखाना==
==राजमंदिरे==
==देवळे, समाध्या, स्मारकशिला आणि कबरी==
कबरी अनेक किल्ल्यांवर आहेत. रायगडावरील कबरीला मदरशाची कबर म्हणतात. लोहगडावर दोन थडगी आहेत आणि मुसलमान पिराची एक कबर आहे.
==बागकारखाना==
==रथखाना==